Maharashtra Jalsampda Vibhag Bharti 2023 : महाराष्ट्र राज्य जलसंपदा विभागामध्ये 16,185 जागांसाठी भरती, या तारखेला होणार भरती

Maharashtra Jalsampda Vibhag Bharti 2023
Maharashtra Jalsampda Vibhag Bharti 2023

Maharashtra Jalsampda Vibhag Bharti : महाराष्ट्र राज्य जलसंपदा विभागामध्ये मोठी नोकर भरती होणार आहे. या भरतीमुळे महाराष्ट्रातील नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. अनेक नोकर भरतीचे मार्ग मोकळे झालेले आहेत. या भरतीचे मार्ग देखील मोकळे होणार आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागामध्ये मोठ्या प्रमाणात जागा रिक्त आहेत. या रिक्त जागा भरण्यासाठी लवकरच भरती केली जाणार आहे. यामुळे राज्यातील तरुणांना दिलासा मिळणार आहे. जलसंपदा विभागात विविध पदांसाठी नोकर भरती केली जाणार आहे.

जलसंपदा विभागामध्ये एकूण 16,185 जागांसाठी नोकर भरती होणार आहे. राज्य सरकारच्या माहितीनुसार, 15 ऑगस्ट 2023 पूर्वी अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. म्हणजेच ही नोकर भरती लवकरच आयोजित करण्याची शक्यता आहे. (Maharashtra Jalsampda Recruitment 2023)

महाराष्ट्र जलसंपदा विभाग भरती 2023

यामध्ये गट क संवर्गातील सरळसेवा पध्दतीने एकूण 8,014 तर पदोन्नती या पद्धतीने 3,163 अशी एकूण 16,185 जागांसाठी नोकर भरती राबवण्यात येणार आहे. त्याचबरोबर गट ड संवर्गातील सरळसेवा पद्धतीने एकूण 4,702 तर पदोन्नती पद्धतीने 306 जागा असे एकूण 5,008 जागांसाठी भरती केली जाणार आहे.

गट क व ड संवर्गातील मिळून सुमारे 16,185 जागांसाठी मेगा नोकर भरती प्रक्रिया लवकरच राबवण्यात येणार आहे. सन 2013 पासून जलसंपदा विभागात कोणतीही नोकर भरती झाली नसल्यामुळे, जलसंपदा विभागात मोठ्या प्रमाणात रिक्त पदांचा आकडा वाढलेला आहे.

जलसंपदा विभागाची भरती कधी होणार?

ही नोकर भरती कधी होणार याची तारीख अजून जाहीर करण्यात आलेली नाही. परंतु, या भरतीची अधिसूचना 15 ऑगस्ट पूर्वी काढण्यात येणार आहे. यानुसार असं वाटते की, जलसंपदा विभागात लवकरच नोकर भरती केली जाईल.

Sharing Is Caring:

Leave a Comment