Pik Vima 2023 : पीकविमा भरलेल्या या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी 18,900 रुपये मिळणार, गावांची यादी पहा

Pik Vima 2023 : सध्याच्या दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये पावसाचा खंड पडल्याने शेतकयांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की, आम्हाला पीकविमा मिळायला हवा. पीकविमा कंपनीने पावसाच्या खंडा करिता पीकविमा दिला जाणार नाही असे म्हटले होते. परंतु, आता पावसाचा खंड पडल्यामुळे दुष्काळ परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांना पीकविमा कंपन्याकडून पीकविमा दिला जाणार आहे.

महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत तूर, कापूस, मका, बाजरी, उडीद, मूग, सोयाबीन या पिकांसाठी विमा संरक्षण घेतले आहे. सध्या पावसाचा मोठा खंड पडल्याने व यंदा समाधानकारक पाऊस झाला नसल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अंतर्गत पीकविमा कंपनी विमा देणार आहे.

pik vima maharashtra महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातील सरसकट पीकविमा दिला जाणार आहे. यासाठी काही गावे पात्र ठरली आहेत. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या जिल्ह्यांतील किती गावे पात्र झालेली आहेत, याबाबत या पोस्टद्वारे आपण जाणून घेणार आहोत.

सरसकट पीकविम्यासाठी हे पात्र जिल्हे
1) बुलडाणा जिल्हा – 98 गावे
2) जालना जिल्हा – 144 गावे
3) बीड जिल्हा – 64 गावे
4) नाशिक जिल्हा – 91 गावे
5) नांदेड जिल्हा – 144 गावे
6) परभणी जिल्हा – 73 गावे
7) लातूर जिल्हा – 120 गावे
8) वाशिम जिल्हा – 112 गावे
9) अकोला जिल्हा – 146 गावे
10) कोल्हापूर जिल्हा – 73 गावे
11) छत्रपती संभाजीनगर – 119 गावे

pik vima हे वरील दिलेल्या जिल्ह्यातील अनेक गावे सरसकट पीकविम्यासाठी पात्र झालेले आहेत. या गावांना पीकविमा दिला जाणार आहे.‌ जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की, कोणती गावे पात्र झालेली आहेत, तर यासाठी तुमच्या जिल्ह्याच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या अधिकृत पोर्टलवरून यादी डाऊनलोड करू शकता.

Sharing Is Caring:

Leave a Comment