Namo Shetkari Yojana: नमो शेतकरी योजना, शेतकऱ्यांना 2000 रुपया ऐवजी 3000 रुपये मिळणार; धनंजय मुंडे यांची मोठी घोषणा

Namo Shetkari Yojana
Namo Shetkari Yojana

Namo Shetkari Maha Samman Nidhi Yojana : महाराष्ट्र सरकारची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना.. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसारखी महाराष्ट्रात ही योजना सुरू करण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला होता. मात्र, आता राजकारणात विविध घडामोडी घडत असताना मंत्रिमंडळात मोठा बदल करण्यात आला आहे. आपण हे पुढे जाणून घेणार आहोतच.

पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये दिले जातात त्याप्रमाणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत देखील शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये देण्याचा निर्णय घेतला होता आणि एकाच दिवशी पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित करण्यात येईल असं सांगण्यात आले होते.

मात्र, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत मोठा बदल होणार आहे. राष्ट्रवादी कॉग्रेस मध्ये फूट झाल्याने अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन गट तयार झाले आहे. यामधील अजित पवार गट हा शिंदे-फडणवीस सरकारमध्ये जाऊन अजित पवार हे आता उपमुख्यमंत्री झाले आहेत. अजित पवार सोबत अनेक आमदार आलेले आहेत. या आमदारांना देखील खाते वाटप करण्यात आले आहेत. आता अब्दुल सत्तार यांच्या जागी धनंजय मुंडे यांना कृषिमंत्री हे खातं देण्यात आले आहे.

धनंजय मुंडे कृषिमंत्री होताच त्यांनी शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. नमो शेतकरी योजनेत (namo shetkari yojana 2023) त्यांनी मोठा बदल केला आहे. आता शेतकऱ्यांना 2000 रुपयांच्या ऐवजी 3000 रुपयांचा हप्ता दिला जाणार आहे. शेतकऱ्यांना वार्षिक 9000 रुपये मिळणार असं नाही. शेतकऱ्यांना 6 हजार रुपयेच दिले जाणार आहे.

आता शेतकऱ्यांना 3000 रुपये मिळणार..

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत मोठा बदल केला आहे.‌ शेतकऱ्यांना तीन हप्त्यात 6000 रुपये देण्याचा निर्णय घेतलेला होता. आता त्याऐवजी शेतकऱ्यांना फक्त दोन हप्त्यांत 6 हजार रुपये देण्याचा निर्णय राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतला आहे. (Namo Shetkari Yojana 1st Installment Date)

नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी उन्हाळ्यात दिला जाईल आणि दुसरा हप्ता शेतकऱ्यांना हिवाळ्याच्या पेरणीपूर्वी दिला जाईल. असे दोन हप्त्यांचे 3000 रुपये मिळून शेतकऱ्यांना 6000 रुपये दिले जाणार आहेत. असा बदल राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केला आहे.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

येथे क्लिक करा.

Sharing Is Caring:

Leave a Comment