Land Map Online : फक्त गट नंबर टाकून जमिनीचा नकाशा काढा, त्यासाठी या स्टेप्स फॉलो करा

Land Map Online : शेतजमिनीची अनेक कामे ऑनलाईन झाली आहेत. सातबारा उतारा काढण्यापासून ते जमिनीची इतर महत्त्वाची कामे तुम्ही घरबसल्या मोबाईलच्या मदतीने ऑनलाईन पद्धतीने करू शकता. त्यामुळे सरकारी कार्यालयात चकरा माराव्या लागत नाही व तुमचा वेळ आणि पैसा देखील वाचतो. 

शेतकऱ्यांसाठी जमिनीचा नकाशा अतिशय महत्त्वाचा आहे. कारण जमिनीच्या हद्दी, रस्ता आणि बांध यामुळे वादविवाद चालू असतात. त्यामुळे अशावेळी जमिनीचा सातबारा उतारा आणि आठ अ उतारा जितका महत्त्वाचा असतो तितकाच जमिनीचा नकाशा महत्वाचा आहे. या नकाशामध्ये रस्ता, हद्दी अशा सर्व नोंदी असतात. यासाठी तुमच्याकडे जमिनीचा नकाशा असणं आवश्यक आहे.

तसेच तुम्हाला जमिनीचा नकाशा कुठे व कसा काढायचा याबाबत देखील माहिती असणं गरजेचं आहे. जमिनीचा नकाशा काढण्यासाठी तुम्हाला कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही. (Land Map Maharashtra) तुम्ही घरी बसून ऑनलाईन पद्धतीने सहज जमिनीचा नकाशा काढू शकता. चला तर मग जाणून घेऊया जमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा काढायचा.

land map download जमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा काढावा?
सर्वप्रथम गुगल वर जाऊन mahabhunakasha.mahabhumi.gov.in असं सर्च करा.
यानंतर, तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल. यामध्ये तुम्हाला डाव्या बाजूला लोकेशन कॉलम मध्ये तुम्हाला तुमचं राज्य आणि कॅटेगिरी यामध्ये रुरल आणि अर्बन असे दोन पर्याय दिसतील. जर तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल तर रुरल जर शहरी भागात असाल तर अर्बन हा पर्याय निवडा.
यानंतर, तुमचा जिल्हा, तालुका आणि तुमचं गावाचे नाव निवडायचे आहे आणि व्हिलेज मॅपवर क्लिक करा.
आता तुमच्यासमोर शेत जमीन ज्या गावांमध्ये आहे त्या गावाचा संपूर्ण नकाशा दिसेल.
तुम्हाला हा नकाशा फुल स्क्रीन मध्ये पाहण्यासाठी होम या पर्यायासमोरील आडवा बाण दिसेल त्यावर क्लिक करा. येथे (+) वर क्लिक केल्यानंतर नकाशा मोठा होईल आणि (-) वर क्लिक केल्यानंतर नकाशा लहान होईल.

land map online download अशा पद्धतीने तुम्ही जमिनीचा नकाशा ऑनलाईन काढू शकता. ही माहिती इतरांना माहित व्हावी यासाठी पुढे नक्की शेअर करा.

Sharing Is Caring:

Leave a Comment