Mofat Cycle Vatap Yojana 2022 | विद्यार्थ्यांना मिळणार मोफत सायकल, असा करा अर्ज..

Mofat Cycle Vatap Yojana 2022: राज्य सरकार विविध योजना राबवित आहे. या योजनेअंतर्गत नागरिकांना दिलासा मिळत असतो. राज्य सरकार सर्वांसाठी काही ना काही योजना राबवित असते. विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने खास योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी सायकल मिळणार आहे.

विद्यार्थी असो वा वृद्ध, विधवा असो वा शेतकरी.. समाजातील प्रत्येक घटकासाठी राज्य सरकार कोणती ना कोणती योजना राबवत असते नि त्याचा लाभ होतानाही दिसतो.. मुलींसाठी राज्य सरकारमार्फत एक खास योजना राबवली जाते, ती म्हणजे, ‘मोफत सायकल वाटप योजना’…

राज्यातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी राज्य सरकार सातत्याने विविध योजना राबवत असतात. मोफत सायकल वाटप योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत सायकल दिल्या जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महाराष्ट्र सरकारने ही योजना सुरु केली. या योजनेची सविस्तर माहिती जाणून घेऊ या.. (Free Cycle Yojana)

मोफत सायकल वाटप योजनेबाबत..


महिला व बालविकास विभाग आणि जिल्हा परिषद मार्फत मोफत सायकल वाटप योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत शिक्षण घेत असलेल्या मुलींना मोफत सायकल वाटप केल्या जाणार आहे. यासाठी 4,500 रुपये अनुदान दिल्या जाते. (Free Cycle Scheme in Maharashtra)

या योजनेचा लाभ ग्रामीण व दुर्गम भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या 5 वी च्या मुलींना सायकल खरेदीसाठी 4,500 रुपये अनुदान मिळेल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येईल. (Free Cycle Scheme in Maharashtra)

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • उत्पन्नाचा दाखला (तलाठी)
  • जात प्रमाणपत्र
  • बॅंक पासबुक
  • अपंगत्व प्रमाणपत्र (अपंग असल्यास)

मोफत सायकल वाटप योजना पात्रता Mofat Cycle Vatap Yojana


मोफत सायकल वाटप योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण भागातील रहिवासी असणं आवश्यक आहे.
मुलगी ही 5‌ वी मध्ये शिकणारी विद्यार्थ्यांनी असावी.
कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न 50 हजार किंवा त्याहून कमी असणं आवश्यक आहे.
लाभार्थी अनुसूचित जातीचा असावा. (Mofat Cycle Vatap Yojana in Marathi)

असा करा ऑनलाईन अर्ज.. online application


मोफत सायकल वाटप योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद महाराष्ट्र यांच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागेल. (Mofat Cycle Vatap Yojana Maharashtra)

तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येत नसेल, तर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. यासाठी तुमच्या तुमच्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती येथील महिला व समाज कल्याण विभागामध्ये जाऊन अर्ज करावा.

हे देखील वाचा-

पीएम आवास योजना लाभार्थ्यांची नवीन यादी जाहीर, असे पहा यादीत नाव..

Join Our WhatsApp Group- Click here

Sharing Is Caring:

1 thought on “Mofat Cycle Vatap Yojana 2022 | विद्यार्थ्यांना मिळणार मोफत सायकल, असा करा अर्ज..”

  1. अर्ज कोणत्या वेबसाईट वर करावा पूर्ण माहिती द्या सर …आणि कुठे करावा मी garamin mdla आहे

    Reply

Leave a Comment