Saur Fencing Yojana Maharashtra | शेतीपिकांचे नुकसान टाळण्यासाठी सरकारकडून मिळणार कुंपणासाठी अनुदान, असा घ्या लाभ..

Saur Fencing Yojana
Saur Fencing Yojana

Saur Fencing Yojana: शेती करतांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. गेल्या काही दिवसांत वन्य प्राण्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. कारण, जंगले छोटी झाल्याने हे वन्य प्राणी आता मानवी वस्तीत घुसू लागले आहेत. या वन्य प्राण्यांचा सर्वाधिक फटका बसतो, तो शेतकऱ्यांच्या शेतीपिकांना.. (Tar Kumpan Yojana Maharashtra 2022)

sheti kumpan yojana अनेकदा वन्य प्राणी शेतात घुसून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. पिकांचे नुकसान टाळण्यासाठी अनेक शेतकरी रात्रंदिवस पहारा देतात. यामुळे शेतकऱ्यांची फजिती देखील होती. तसेच शेतकऱ्यांवर वन्य प्राण्यांच्या हल्ल्याचाही धोका देखील असतो. (सौर कुंपण योजना)

वन्य प्राण्यांमुळे शेतीपिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी 4 ऑगस्ट 2015 रोजी राज्य सरकारने खास योजना सुरू केली होती. या योजनेचं नाव डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास असं आहे. या योजनेची व्याप्ती आणखी अजून वाढली आहे. (Solar Fencing Yojana Maharashtra)

वन्य प्राण्यांमुळे पिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी सौर ऊर्जा कुंपण उभारण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. (Solar Fencing Yojana Maharashtra) या योजनेस सरकारने मान्यता दिली आहे. या योजनेबाबत सविस्तर जाणून घेऊ या..

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेबाबत…


डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेत 2022-23 मध्ये 100 कोटींपैकी 50 कोटी रुपये निधी सौर ऊर्जा कुंपणासाठी वापरण्यात जाईल. लाभार्थ्यांना या योजनेची माहिती देण्यासाठी व्यवस्थापन प्रणाली वापरण्यात येणार आहे.

अनुदान किती मिळणार..? Saur Fencing Yojana


जन-विकास योजनेअंतर्गत लाभार्थ्याला सौर ऊर्जा कुंपणाच्या किंमतीच्या 75 टक्के किंवा 15 हजार रुपये, यापैकी जी कमी असेल, त्या रकमेचे अनुदान मिळेल. सौर ऊर्जा साहित्याच्या किंमतीच्या अनुषंगाने बाकीची 25 टक्के रक्कम लाभार्थ्याला खर्च करावी लागेल. (Solar Fencing Subsidy in Maharashtra)

Saur Fencing Yojana योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • विहित नमुन्यातील अर्ज
  • सातबारा व 8-अ उतारा
  • जातीचा दाखला

योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे करा अर्ज..


विहित नमुन्यातील अर्ज व्यवस्थितपणे भरून, आवश्यक कागदपत्रे जोडून, संवर्ग विकास अधिकारी, पंचायत समिती यांच्याकडे सादर करावा. अर्जाचा नमुना तुम्हाला कृषी विभाग, पंचायत समिती यांच्याकडे मिळून जाईल.


हे देखील वाचा-


Sharing Is Caring:

1 thought on “Saur Fencing Yojana Maharashtra | शेतीपिकांचे नुकसान टाळण्यासाठी सरकारकडून मिळणार कुंपणासाठी अनुदान, असा घ्या लाभ..”

Leave a Comment