Maha egram App. ग्रामपंचयतीची सर्व प्रमाणपत्र आणि दाखले मिळवा घरबसल्या मोबाईलवर! जाणून घ्या संपूर्ण माहिती.

Maha egram app
Maha egram app

Maha egram app ग्रामपंचायत मध्ये असलेल्या दाखला किंवा प्रमाणपत्रांची वेळोवेळी आपल्याला गरज पडत असते.. ते प्रमाणपत्र किंवा दाखले काढण्यासाठी आधी काढण्यासाठी खूप मोठी प्रक्रिया करावी लागत असे. त्यामुळे वेळेवर प्रमाणपत्र किंवा दाखले मिळण्यास अडचण येत असे. परंतु आता ही अडचण कमी होणार आहे आता मोबाईल वरून सुद्धा ग्रामपंचायतीचे दाखले आणि प्रमाणपत्र घरबसल्या काढता येणार आहे. यासाठी Mahaegram Citizen App लॉन्च करण्यात आलेले आहे.

     या ॲपद्वारे ग्रामपंचायती अंतर्गत मिळणारी सर्वच कागदपत्र तुम्ही घरबसल्या मिळवू शकतात. प्रशासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाची ही नवीन योजना आहे. या योजनेअंतर्गत घरबसल्या जन्म दाखला, विवाह नोंदणी दाखला, मृत्यू दाखला, घरपट्टी, पाणीपट्टी, कर भरणा असे कित्येक कागदपत्र तुम्ही या मोबाईलच्या माध्यमातून मिळवू शकतात. नागरिकांच्या फायद्यासाठी हे ॲप लॉन्च करण्यात आलेले आहे. महाराष्ट्र शासनाकडून ऑनलाइन पद्धतीने नागरिकांना सुविधा देता येईल यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला आहे. त्यामुळे वेळेची आणि पैशांची मोठी बचत होणार आहे.

 जातीमान्य प्रमाणपत्र, निवास सर्टिफिकेट, जन्म प्रमाणपत्र,  गावभाषी प्रमाणपत्र, आर्थिक वर्षावली असेल तर ते ग्रामपंचायत कार्यालयाच्या वेबसाइटवरील सेवा वापरून आपण विनंती करून कागदपत्रं काढता येत होते.  काही प्रमाणपत्रे प्राप्त करायच्या असल्यास,  त्या प्रमाणपत्रांची माहिती सादर करून आपल्या ग्रामपंचायत कार्यालयात विनंती करावी लागत असे परंतु आता ही सगळी वेळ खाऊ प्रक्रियेला लगाम लागणार आहे. गावठाण मधील जागेचा उतारा जन्म प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र, दारिद्र रेषेखालील प्रमाणपत्र नमुना नंबर आठ, विवाह नोंदणी दाखला ही अशी कागदपत्रे देखील ऑनलाईन मोबाईल वरून घरबसल्या काढू शकतात.

Sharing Is Caring:

Leave a Comment