Jamin Mojani App | आता 2 मिनिटांत घरबसल्या जमिनीची मोजणी करा, त्यासाठी या स्टेप्स फॉलो करा

Jamin Mojani App
Jamin Mojani App

Jamin Mojani App : शेत जमिनीचे व प्लॉटचे वादविवाद नेहमी सुरूच असतात. ग्रामीण भागात तर थोड्याशा शेतीच्या बांधासाठी चक्क जीवावर उठतात. कारण दोघांना असेही वाटते माझी जमीन त्याच्याकडे त्याला वाटते माझी जमीन त्याच्याकडे आहे. यामध्ये कोणीच समजून घेत नसल्यामुळे दोघे देखील मारामारी करायला लागतात.. हे वाद होऊ नये किंवा हे वाऊ टाळण्यासाठी तुम्हाला जमिनीची मोजणी करणं आवश्यक आहे.

जसे ग्रामीण भागात शेतीची मोजणी करावी लागते, त्याप्रमाणे शहरी भागात देखील जमीन मोजणीची (land measurement) आवश्यकता असते. यासाठी तुम्ही शासकीय मोजणीचा अधिक वापर करता. मात्र, ही मोजणी तुम्ही आता घरबसल्या मोबाईलवरून करु शकता. यासाठी एक खास मोबाईल ॲप आहे, ज्याद्वारे घरी बसून आरामशीर कोणत्याही जमिनीची व प्लॉटची मोजणी करू शकता. land measurement app

अनेकवेळा ग्रामीण भागात जमिनीची मोजणी योग्य पद्धतीने केली नसल्याने शेतीच्या बांधावरून वाद होत असतात. काहीजण शेत जमिनाचा बांध सरकवतात त्यामुळे वाद व्हायला लागतात. हे वाद होऊ नये यासाठी तुम्हाला जमिनीची मोजणी करणं गरजेचं आहे. यासाठी तुम्हाला जास्त मेहनत घेण्याची आवश्यकता पडणार नाही. हे काम तुम्ही मोबाईलवरून करू शकणार आहात. (Land Record)

तर सरकारी मोजणी करायची म्हटलं तर त्यासाठी पैसा द्यावा लागतो. पैसे नसल्यामुळे हे वाद असेच सुरू राहतात. मात्र, आज तुम्हाला यावर एक जबरदस्त आयडिया देणार आहोत. ज्याद्वारे तुम्ही घरबसल्या 2 मिनिटांत जमिनीची मोजणी अचूकपणे करू शकता. हे मोजणी तुम्हाला मोफत करता येणार आहे. यासाठी तुम्हाला एक रुपया खर्च करण्याची देखील गरज पडणार नाही. हे काम तुम्ही आपल्या मोबाईलवरून करू शकणार आहात. चला तर मग जाणून घेऊया घरबसल्या जमिनीची किंवा प्लॉटची मोजणी कशी करायची.

घरबसल्या जमिनीची मोजणी कशी करायची?

सर्वप्रथम तुम्हाला ‘गुगल प्ले स्टोअर’वर (Google Play Store) जाऊन हॅलो कृषी (Hello Krushi) हे ॲप डाऊनलोड करायचे आहे.
आता तुम्हाला ॲप ओपन करून तुमचा मोबाईल नंबर, नाव, जिल्हा, तालुका, गाव इत्यादी माहिती भरून रजिस्ट्रेशन करा.
आता तुमच्यासमोर होमपेज ओपन होईल. तिथे तुम्हाला ‘जमिनीची मोजणी’ असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
यानंतर, तुम्ही कुठे उभे आहात त्या ठिकाणचा सॅटेलाईट नकाशा दिसेल. आता तुम्हाला तुमच्या शेतजमिनीचे बांधाच्या कोपरे निवडायचे आहे.
यानंतर, तुम्हाला तुमच्या शेतजमिनीचे क्षेत्रफळ, लांबी किती आहे याबाबतची माहिती तुम्हाला दिसून जाईल.

हे देखील वाचा-

  1. विहिरीला व बोअरला पाणी कुठे लागणार, आता तुम्ही पाहू शकणार
  2. मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा
  3. घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
  4. अशा प्रकारे सुरू करा शेळीपालन. यश नक्कीच मिळेल.
Sharing Is Caring:

Leave a Comment