Government Insurance Scheme : शिंदे सरकारची मोठी घोषणा! वारकऱ्यांना मिळणार 5 लाखांपर्यंत विमा संरक्षण

Government Insurance Scheme
Government Insurance Scheme

Government Insurance Scheme : पंढरपूरच्या आषाढी वारीत महाराष्ट्रातून लाखो वारकरी सहभागी झाले आहेत. या विठ्ठल भक्तांसाठी सरकारने मोठी घोषणा केली आहे. आषाढी वारीत सहभागी झालेल्या सर्व वारकऱ्यांसाठी राज्य सरकारतर्फे विमा संरक्षण देणारी विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना राबवण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला.

Government Scheme पंढरीच्या वारीत सहभागी होणाऱ्या लाखों वारकऱ्यांना विमा संरक्षण दिला जाणार आहे. वारीच्या 30 दिवसांसाठी हा विमा संरक्षण असणार आहे. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात वारी नियोजनाच्या आढावा बैठकीत वारकरी बांधवांना विमा योजना लागू करण्याबाबत चर्चा केली. ashadhi wari 2023

राधाकृष्ण विखे पाटील यांनी हा प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर करून या योजनेला मान्यता दिली. या योजनेला मंजुरी दिल्याबद्दल राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे आभार मानले. विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा संरक्षण योजनेमुळे वारकरी आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला.

वारकऱ्यांना किती विमा मिळणार?

वारीच्या दरम्यान अपघात किंवा दुर्घटना होतात आणि त्यात वारकरी जखमी होतात किंवा त्यांचा दुर्दैवी मृत्यू होतो. अशावेळी वारकऱ्याला किंवा त्याच्या कुटुंबाला पैशाची आवश्यकता असते. यामुळे ही योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

वारीमध्ये एखाद्या वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांस 5 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येईल. दुर्घटनेत कायमचे अपंगत्व किंवा विकलांगता आल्यास 1 लाख रुपये विमा संरक्षण दिला जाईल. अंशत: अपंगत्व आल्यास 50 हजार रुपये तसेच वारीच्या दरम्यान आजारी पडल्यास औषधोपचारासाठी 35 हजार रुपयापर्यंतचा खर्च देण्यात येईल.

Vitthal Rukhmini Varkari Vima Chatra Yojana

1) वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास – 5 लाख रुपये विमा
2) वारकऱ्याला अपंगत्व किंवा विकलांगता आल्यावर – 1 लाख रुपये विमा
3) वारकऱ्यांना अपंगत्व आल्यास – 50,000 रुपये विमा
4) वारकरी आजारी पडल्यावर – 35,000 रुपये विमा

विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना राबविण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. ही योजना मदत व पुनर्वसन विभागामार्फत राबविण्यात येत आहे. असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. तसेच ही योजना 30 दिवसांच्या कालावधीसाठी असणार आहे. या योजनेचा लाभ पंढरपूरच्या वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांना मिळणार आहे.

हे देखील वाचा-

  1. विहिरीला व बोअरला पाणी कुठे लागणार, आता तुम्ही पाहू शकणार
  2. मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा
  3. घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
  4. अशा प्रकारे सुरू करा शेळीपालन. यश नक्कीच मिळेल.
Sharing Is Caring:

Leave a Comment