Shet Tale Yojana | शेततळं बांधण्यासाठी सरकार देतंय 1 लाख रुपये अनुदान, वाचा सविस्तर

Shet Tale Yojana
Shet Tale Yojana

Shet Tale Yojana : शेतकऱ्यांचे शेतीमध्ये उत्पन्न वाढावे आणि त्यांचे काम सोपे व्हावे यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार विविध योजना राबवत आहे. शेती करताना अनेकवेळा पाणी टंचाईची समस्या येते. अशावेळी पिकांना पाणी देण महत्वाचं असते. परंतु, पाण्याचा साठा नसला केल्यामुळे शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध नसते. यासाठी आपल्याला पाणी साठवण अतिशय गरजेचं आहे.

पाण्याचा मुबलक प्रमाणात वापर व्हावा यासाठी आपण ठिबक सिंचनाचा किंवा तुषार सिंचनाचा वापर जास्तीत जास्त करावा. यामुळे पाण्याची बचत देखील होईल आणि वेळ देखील वाचेल. परंतु, शेतकऱ्यांना पाणी साठवणे अतिशय महत्वाचं आहे. तर यासाठी तुम्ही विहीर किंवा शेततळ्याचा वापर करू शकता‌. यामध्ये शेततळे देखील उत्तम पर्याय आहे. शेततळ्यासाठी शेतकऱ्यांना सरकार प्रोत्साहित करत आहे. shet tale subsidy in maharashtra

शेतकऱ्याने पावसाचे पाणी साठवण्यासाठी शेततळे बांधावे आणि पाण्याची साठवणूक करावी, जेणेकरून पुढे अडचण येणार नाही. शेतकऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. मात्र, शेततळ्यामुळे (shettale subsidy) पाणी टंचाईची समस्या निर्माण होणार नाही. यासाठी तुम्हाला सरकार देखील आर्थिक मदत देत आहे. त्यामुळे तुम्ही शेततळे बांधून घ्यायला हवे. shettale subsidy maharashtra

कारण शेतकऱ्यांना शेततळ्यासाठी अनुदान देणार आहे. शेतकरी या शेततळ्यात पाणी साचवून अडचणीच्या वेळी वापर करू शकता. (shet tale yojana in marathi) शेतकऱ्यांना ठिबक सिंचन, तुषार सिंचन व पोर्टेबल सिंचनासाठी अनुदान देत आहे. तसेच राजस्थान सरकार शेततळं बांधण्यासाठी 1 लाखांहून अधिक अनुदान देत आहे. या योजनेचा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना दिला जाणार आहे याबाबत जाणून घेऊया.

योजनेची पात्रता

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याकडे कमीत कमी 0.3 हेक्टर जमीन असावी.
तुम्हाला शेततळं दाट लोकवस्तीपासून आणि रस्त्याच्या कडेला कमीत कमी 50 फूट अंतरावर बांधावे लागेल. असा या योजनेचा नियम आहे.

ही योजना राजस्थान सरकारने सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वी राजस्थान सरकारने अर्थसंकल्प सादर केला आहे. यामध्ये सरकारने शेततळ्यासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या रकमेत वाढ केली. आतापर्यंत राजस्थान राज्यातील शेतकऱ्यांना 90 हजार रुपये एवढं अनुदान दिले जात आहे. मात्र, आता 1 लाख 10 हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment