ITR Filling Benefits | टॅक्स लागत नसेल तरी देखील ITR फाईल करा, कारण मिळतात हे मोठे फायदे

ITR Filling Benefits: ITR म्हणजेच इन्कम टॅक्स रिटर्न असा फुल फॉर्म होतो. यालाच आयकर असे देखील म्हणतात.. म्हणजेच आपल्या उत्पन्नावरील कर.. दरवर्षी आपल्या उत्पन्नाचा एक निश्चित भाग केंद्र सरकारला द्यावा लागतो, यालाच ITR भरणे म्हणतात. उद्योजक, व्यावसायिकांना दरवर्षी स्वतंत्र ITR भरावा लागतो, तर नोकरदारांच्या वेतनातून आयकरची रक्कम कापली जाते.

अनेकजण दरवर्षी लाखो रुपयांची कमाई करतात. परंतु, आपले उत्पन्न नाममात्र दाखवून करातून पळवाट काढतात. दरवर्षी आयकर विभागाने 31 जुलै ही ITR फाईल करण्याची शेवटची तारीख दिलेली असते. या मुदतीपर्यंत इन्कम टॅक्स न भरल्यास दंड भरावा लागू शकतो. income tax return filing benefits

अनेकजण टॅक्स टाळण्यासाठी विविध प्रकारचे मार्ग शोधतात. परंतु, टॅक्स भरणे ही तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकते. इन्कम टॅक्स न भरल्यास तुमच्या कामात अडचणी निर्माण होऊ शकतात. घरबसल्या तुम्ही आयटीआर भरु शकता. ITR भरण्याचे अनेक फायदे आहेत, ते आपण जाणून घेणार आहोत.

कर्ज घेण्यासाठी फायदेशीर


कर्ज घेताना बॅंक तुमच्या उत्पन्नावर लक्ष देते. या उत्पन्नाच्या आधारावर तुम्हाला बॅंक कर्ज देत असते. परंतु तुम्ही जर ITR भरलेला असेल तर आयटीआर मध्ये नोंदवलेल्या माहितीच्या आधारे बॅंक तुम्हाला कर्ज देईल. ITR फाईल केल्यामुळे बँकेचे कर्ज मिळणे सोपे आहे.

व्यवसाय वाढीसाठी फायदेशीर


जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर ITR भरणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकते. कारण सरकारी विभाग किंवा बड्या कंपन्या गेल्या 2 ते 3 वर्षांपासून आयटीआर भरणाऱ्या व्यावसायिकांकडून उत्पादने खरेदी करण्यासाठी प्राधान्य देतात. itr benefits in marathi

विमा संरक्षण मिळणार


तुम्ही जर ITR फाईल केलेली असेल तर तुम्हाला विमा संरक्षण देखील दिला जातो. कारण विमा संरक्षण देण्याअगोदर विमा कंपन्या आयटीआरची मागणी करतात. विमा कंपन्या ITR च्या मदतीने उत्पन्न आणि तुमची नियमितता तपासतात आणि त्याआधारे विमा संरक्षण दिल्या जातो.

Sharing Is Caring:

Leave a Comment