Free Solar Cooking Stove 2023 फ्री सोलर कुकिंग स्टोव्ह योजना 2023 सरकार देशातील जनतेच्या हितासाठी नेहमीच नवनवीन योजना राबवत असते. जर एखाद्या देशाची प्रगती करायची असेल तर सर्वात आधी त्या देशातील मूलभूत घटकांपासून वंचित असलेल्या वर्गाला जगण्यासाठी साधनांची पूर्तता करून देणे आणि आणि वंचित घटकांचा विकास करणे आवश्यक आहे. जेणेकरून देशाचा विकास होऊ शकतो. यासाठी सरकार प्रयत्नशील असते. याच प्रयत्नातून सरकारने फ्री सोलर कुकिंग स्टोव्ह 2023 ही योजना अमलात आणली आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार गरीब आणि मागासवर्गीयांना सौर उर्जेवर चालणारे स्टोव्ह देण्याची योजना तयार करत आहे.
या योजनेमुळे भारतातील इंधन चा वापर कमी होईल. ज्यामुळे इंधन बचतीसाठी मदत होणार आहे. त्याचप्रमाणे गरीब आणि मागासवर्गीय जनतेचा खर्चही कमी होईल. सौर ऊर्जेवर चालणारे हे स्टोव्ह पर्यावरणासाठी सुद्धा फायदेशीर ठरणार आहे. भारतातील 75 लाख अधिक गरीब आणि मागासवर्गीय लोकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
स्वयंपाकाच्या गॅसच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्यांच्या जीवनात महागाईचा भडका उडाला आहे. स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात दररोज वाढ होत आहे. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी सरकारी तेल कंपनी इंडियन ऑइलने असा इनडोअर सोलर कुकिंग स्टोव्ह लॉन्च केला आहे, जो सौरऊर्जेने अन्न शिजवेल. हा सोलर स्टोव्ह चार्जही करू शकतो. सूर्या नूतन असे या सोलर स्टोव्हचे नाव आहे. ते सौरऊर्जेवर चालते. यामध्ये प्रथम सौर ऊर्जेतून ऊर्जा थर्मल बॅटरीमध्ये साठवली जाते. Free Solar Cooking Stove 2023 त्यानंतर या उर्जेने सकाळपासून रात्रीपर्यंत अन्न शिजवता येते. हा रिचार्ज करण्यायोग्य स्टोव्ह आहे. हा स्टोव्ह खरेदी करण्याव्यतिरिक्त त्याच्या देखभालीवर कोणताही खर्च नाही. इंडियन ऑइलच्या म्हणण्यानुसार, सूर्य नूतन सोलर स्टोव्ह इंडियन ऑइलच्या संशोधन आणि विकास (R&D) टीमने विकसित केला आहे. त्याच्या प्रीमियम मॉडेलच्या मदतीने, चार जणांच्या कुटुंबासाठी नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण सहज शिजवले जाऊ शकते.
सोलर कुकिंग स्टोव्हची किंमत जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
हे देखील वाचा-
- विहिरीला व बोअरला पाणी कुठे लागणार, आता तुम्ही पाहू शकणार
- मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा
- घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
- अशा प्रकारे सुरू करा शेळीपालन. यश नक्कीच मिळेल.