Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana 2023 | शेतकऱ्यांचा अपघात झाल्यास मिळणार 2 लाख रुपयांचा विमा, वाचा सविस्तर

Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana 2023

Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana 2023: शेती करत असताना शेतकऱ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. शेतकऱ्यांचे शेतीचे कामे करत असताना अपघात होत असतो. अपघातामध्ये काही शेतकऱ्यांचे दुर्दैवी मृत्यू देखील होत असतात. अशा कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहतो.

घरातील कर्ता पुरुष गमावल्याने परिवारावर मोठे संकट उभे राहते. मात्र, या संकटातून बाहेर पडण्यासाठी राज्य सरकारने या अपघात ग्रस्त शेतकरी कुटुंबाला आर्थिक लाभ देण्यासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा (Insurance Scheme) योजना राबवल्या जाते. ही योजनेची माहिती आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे.

ही योजना 2019 मध्ये सुरू करण्यात आलेली आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेअंतर्गत (gopinath munde shetkari apghat vima scheme) शेतीमध्ये काम करत असताना जर शेतकऱ्याचा अपघात झाल्यास त्या शेतकऱ्याला या योजनेअंतर्गत विमा दिला जातो.

Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचा अपघातामध्ये मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास अशा शेतकऱ्यांना किंवा शेतकरी कुटुंबाला हे अनुदान दिले जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्रे आणि सहभागी होण्यासाठी काय करावे लागते याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

एवढे अनुदान मिळणार
शेतकऱ्याचा अपघातात मृत्यू झाल्यास अशा मृत शेतकऱ्याच्या कुटुंबाला या योजनेअंतर्गत 2 लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. तसेच अपघातामध्ये दोन हात, दोन पाय किंवा दोन डोळे गमावलेल्या शेतकऱ्याला देखील 2 लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे. जर एक अवयव निकामी झाल्यास 1 लाख रुपयांचे अनुदान दिले जाईल.

हे अपघात झाल्यास मिळणार अनुदान

  • कीटकनाशकांमुळे किंवा जंतुनाशकांमुळे विषबाधा झाल्यास
  • रस्ता किंवा रेल्वे अपघात झाल्यास
  • पाण्यात बुडून मृत्यू झाल्यास
  • विजेचा शॉक
  • सर्प दंश किंवा विंचू दंश
  • विज पडून मृत्यू
  • नक्षलवाद्याकडून हत्या झाल्यास
  • दंगलीत जखमी झाल्यास किंवा मृत्यू झाल्यास
  • वन्य जनावरांच्या हल्ल्यात जखमी झाल्यास किंवा मृत्यू झाल्यास
  • बाळंतपणात मृत्यू झाल्यास

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

  • अपघात ग्रस्त शेतकऱ्याचा सातबारा उतारा मृत्यू दाखला
  • वारस नोंद
  • वयाचा पुरावा
  • प्रथम माहिती अहवाल
  • स्थळ पंचनामा
  • पोलीस पाटीलचा अहवाल

अर्ज कसा करावा अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा.

येथे क्लिक करा.

हे देखील वाचा-

  1. विहिरीला व बोअरला पाणी कुठे लागणार, आता तुम्ही पाहू शकणार
  2. मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा
  3. घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
  4. अशा प्रकारे सुरू करा शेळीपालन. यश नक्कीच मिळेल.
Sharing Is Caring:

Leave a Comment