राज्यात लवकरच 3165 जागांसाठी तलाठी भरती होणार, तरुणांसाठी खुशखबर..! Talathi Bharti Maharashtra 2022

Talathi Bharti Maharashtra 2022: राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी मोठी व आनंदाची बातमी आहे. राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून तलाठ्यांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने महसूल यंत्रणेवर ताण येत आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने तलाठी भरती घेण्याचा निर्णय घेतला आहे. या बातमीमुळे तरुणांना मोठा दिलासा मिळणार आहे.

राज्यात लवकरच 3165 जागांसाठी तलाठी भरती घेणार आहेत. या तलाठी भरतीसाठी मंजुरी दिली असून, पहिल्या टप्प्यात एक हजार तलाठ्यांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. ही भरती टप्प्याने घेतली जाणार आहे. (Talathi Recruitment 2022)

Talathi Bharti Maharashtra 2022

तलाठी भरती 2022

राज्यात मोठ्या प्रमाणात तलाठ्यांच्या जागा रिक्त आहेत. यामुळे सध्याच्या महसूल यंत्रणेनवर म्हणजेच कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येत आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने तलाठी भरती करण्याचा निर्णय घेतलेला आहे. राज्यात 3165 जागांसाठी भरतीसाठी मंजुरी दिली आहे. पहिल्या टप्प्यात एक हजार तलाठ्यांची भरती होणार आहे.

तलाठी विविध प्रकारची कामे करत असतो. एका तलाठ्याकडे अनेक गावे दिली जातात. यामुळे तलाठ्यांची कामे वाढलेली आहेत. तलाठ्यांना अशी अनेक कामे आहे, जी अनेकांना माहीत नसेल. तर चला जाणून घेऊया कोणकोणती कामे तलाठीला करावी लागतात. (Talathi Bharti 2022)

Talathi Bharti 2022 Maharashtra

तलाठीची कामे

  • गावांचे अर्थकारण अन् मालमत्ताचा लेखाजोखा ठेवण्याचे काम
  • महसूल नोंदी व कर वसुली
  • सात बारा उतारा देण्यासह ऑनलाईन कामकाज
  • अवैध गौण खनिजाविरोधातील कारवाई
  • संजय गांधी निराधार योजनेचे कामकाज
  • निवडणूक
  • पुरवठा विभाग
  • पिकांसह विविध पंचनामे
  • सर्वेक्षणाची कामे

ही सर्व कामे तलाठ्यालाच करावी लागतात. अजून बरीचशी कामे तलाठ्यांना करावी लागतात. यामुळे तलाठ्यांच्या कामाचा ताण वाढलेला आहे. म्हणून राज्य सरकारने लवकरच तलाठी भरती घेण्याचा निर्णय घेतला आहे. (Talathi Bharti 2022 Online Form Date Maharashtra)

भरपूर ठिकाणी 3 ते 4 गावांसाठी एकच तलाठी असल्या कारणाने, या सर्व कामांचा ताण तलाठ्यांवर येतो. या जास्त कामांच्या तणावामुळे सरकारच्या विविध योजनांपासून नागरिकही वंचित राहतात. कारण तलाठ्यांकडे जास्त कामे झाल्यामुळे या गोष्टींकडे जास्त दिल्या जात नाही.

परंतु, आता लवकरच राज्यात तलाठी भरती होणार असल्यामुळे नागरिकांना तसेच बेरोजगार तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे. ही माहिती राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी तसेच नागरिकांसाठी महत्वाची आहे. आपणं थोडंसं सहकार्य करून ही माहिती पुढे नक्की शेअर करा.

Sharing Is Caring:

4 thoughts on “राज्यात लवकरच 3165 जागांसाठी तलाठी भरती होणार, तरुणांसाठी खुशखबर..! Talathi Bharti Maharashtra 2022”

Leave a Comment