Biomass Stove Yojana Maharashtra | राज्यात निर्धूर चुलींचे मोफत वाटप; असा करा अर्ज

Biomass Stove Yojana Maharashtra: राज्य सरकारची नवीन योजना आली.. राज्यात महात्मा फुले नविनीकरणीय उर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित अंतर्गत निर्धूर चुलींचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व पात्र नागरिकांना मोफत निर्धूर चूल मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. या योजनेचा फायदा कोणाला व कसा होणार संपूर्ण माहिती जाणून घेऊया..

biomass stove yojana maharashtra
biomass stove yojana maharashtra

निर्धूर चूलीचे मोफत वाटप महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी या संस्थेकडून करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांतील पात्र नागरिकांना 15 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज करावा. इच्छुक व पात्र असणाऱ्या रहिवाश्यांनी 15 ऑगस्ट 2022 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत जिल्हानिहाय RM/DM-MPBCDC शी संवाद साधण्याचे आवाहन केले आहे. (Biomass Stove Yojana)

या योजनेसाठी कोण असणार पात्र..?

  • पर्यावरणीय अनुकूल सुधारित निर्धूर चूल मोफत वाटपासाठी निकषयोग्य पात्र रहिवाश्यांनी अर्ज करावेत.
  • लाभार्थी पात्रतेसाठी रहिवाशी अनुसूचित जातीचा असावा.
  • लाभार्थी रहिवाशी गरिबी/ दारिद्र्य रेषेखालील असावा.
  • लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न 1,12,000 रुपये किंवा यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
  • लाभार्थ्यांकडे एलपीजी गॅस कनेक्शन नसावे.
  • लाभार्थ्यांना योजनेअंतर्गत 100 टक्के अनुदानावर म्हणजेच मोफत चुलीचे वाटप होणार आहे.

Biomass Stove Yojana Maharashtra

या निर्धुर चुलीची किंमत 4 ते 5 हजार पर्यंत असणार आहे. ही चुल लाभार्थ्यांना मोफत दिल्या जाणार आहे. यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे. राज्यातील सर्व 36 जिल्ह्यातील पात्र रहिवाशांनी मोफत निर्धूर चुलसाठी अर्ज करण्याचे आवाहन महाप्रितने केले आहे. (Biomass Stove Online Form)

Biomass Stove Yojana Online Form

अर्ज प्रक्रिया

राज्यातील सर्व जिल्ह्यांतील पात्र रहिवाश्यांनी 15 ऑगस्ट 2022 रोजी 5 वाजेपर्यंत अर्ज करावा.. राज्यातील सर्व 36 जिल्ह्यातील पात्र रहिवाशांनी मोफत निर्धूर चुलसाठी अर्ज करण्याचे आवाहन महाप्रितने केले आहे. (MAHAPREIT – A Subsidiary of MPBCDC, Govt of Maharashtra Company)

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://maha-diwa.vercel.app/ या वेबसाइटला भेट द्या. (Biomass Stove Yojana Maharashtra)

या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर, तुमचे पूर्ण नाव, मोबाईल नंबर, आधार क्रमांक, पत्ता, तालुका, जिल्हा, इत्यादी संपूर्ण माहिती व्यवस्थितपणे भरून अर्ज सबमिट करा. (biomass stove online form maharashtra)

या योजनेची संपूर्ण माहिती या लेखात जाणून घेतली आहे. तसेच अधिक माहितीसाठी https://mahapreit.inhttps://mpbcdc.maharashtra.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी. योजनेतंर्गत निर्धूर चुलींचे मोफत वाटप करण्यात येणार आहे, या योजनेची माहिती पुढे नक्की पाठवा.

Sharing Is Caring:

6 thoughts on “Biomass Stove Yojana Maharashtra | राज्यात निर्धूर चुलींचे मोफत वाटप; असा करा अर्ज”

  1. योजना चांगली चालू केलेली आहे गरजू लोकांना मदतीचा हात

    Reply

Leave a Comment