Shabari Gharkul Yojana | घरकुलासाठी आता मिळणार 2 लाख रुपये, त्यासाठी घ्या या नवीन योजनेचा लाभ

Shabari Gharkul Yojana
Shabari Gharkul Yojana

Shabri Adivasi Gharkul Yojana : राज्य शासन व केंद्र शासन विविध योजना राबवत असते. अनेकांची आर्थिक स्थिती हालाखीची असल्यामुळे ते त्यांचे स्वप्न पूर्ण करू शकत नाही. अनेकांचे महत्वाचे स्वप्न असते ते म्हणजे चांगले घर असणे. परंतु, पैशाअभावी हे स्वप्न पूर्ण करता येत नाही. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरकार योजना राबवत आहे.

आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या कुटुंबाला घर मिळावे, यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार विविध योजना राबवत आहे. प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेसारखी अजून एक योजना आहे. या योजनेअंतर्गत घरकुलासाठी आर्थिक मदत दिली जाते. (Shabari Gharkul Yojana)

सरकारची पीएम घरकुल आवास योजनेसारखी अजून एक खास योजना आहे, जिचं नाव शबरी आदिवासी घरकुल योजना असं आहे. sabari gharkul yojana शबरी आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत आदिवासी जमातीतील कुटुंबांना नवीन घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य सरकारकडून दिले जाते.

Shabari Gharkul Awas Yojana

अनुसूचित जमाती प्रवर्गातील कुटुंबासाठी शबरी आदिवासी घरकुल योजना राबविली जाते. मात्र, या योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम कमी असल्याने राज्य व केंद्र सरकार मिळून वाढीव मदत देण्यात येत आहे. आता 2 लाख रुपये अनुदान दिले जात आहे.

आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या कुटुंबाला घर मिळावे यासाठी सरकार ही योजना राबवत आहे. या योजनेअंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाणार आहे. सहा वर्षांत या योजनेअंतर्गत 2887 घरकुलांचे उद्दिष्ट ठेवले आहे, त्यापैकी 758 घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे.

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

1) अर्जदाराचे आधार कार्ड
2) जातीचे प्रमाणपत्र
3) रहिवासी प्रमाणपत्र
4) सातबारा व 8 अ उतारा
5) शाळा सोडल्याचा दाखला
6) वयाचे प्रमाणपत्र
7) जागा उपलब्धतेचे प्रमाणपत्र
8) उत्पन्नाचा दाखला (तहसीलदार)
9) ग्रामसभेचा ठराव
10) शासन वेळोवेळी विहित करतील अशी कागदपत्रे

योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे संपर्क करा
शबरी आवास योजना ही आदिवासी जमातीतील नागरिकांसाठी आहे. या योजनेच्या अधिक माहितीसाठी संबंधित प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय या पत्त्यावर किंवा तालुका पंचायत समिती कार्यालयात संपर्क करावा.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी आदिवासी भागातील ग्रामपंचायत, पंचायत समिती किंवा गट विकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधू शकता.

हे देखील वाचा-

  1. विहिरीला व बोअरला पाणी कुठे लागणार, आता तुम्ही पाहू शकणार
  2. मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा
  3. घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
  4. अशा प्रकारे सुरू करा शेळीपालन. यश नक्कीच मिळेल.
Sharing Is Caring:

Leave a Comment