मुलांचा स्क्रीनटाईम कमी करण्यासाठी ‘हे’ करा. reduce screen time in kids

माझी मुलगी चार वर्षांची आहे. तिला सकाळी उठल्या उठल्या हातात फोन लागतो. फोनवर कार्टून लावून तासनतास बघत असते. काल तिचे डोळे अचानक चुरचुरू लागले. माझ्याकडे अगदी धावत आली. “मम्मा, माझ्या डोळ्यांची आग होत आहे” असं सांगितल्यावर मी पण घाबरले. गार पाण्यात रुमाल बुडवून तिचे डोळे शेकले. थोड्या वेळाने डोळ्याचा दाह कमी झाला आणि ती झोपली. मात्र मी अस्वस्थ झाले. इतक्या लहान वयात मुलीला डोळ्यांचा त्रास होतोय या काळजीने मला रात्री झोप लागली नाही. सतत फोन डोळ्यासमोर धरल्याने तिला त्रास होतोय हे मला समजले. तिला डॉक्टरांकडे घेऊन गेल्यावर समजले मोबाईलच्या किरणांचा आघात थेट डोळ्यांवर होत असल्याने त्याचा दृष्टीवर परिणाम होऊन चष्मा लागण्याची वेळ येऊ शकते. तेव्हापासून मी मुलीला कोणत्याच डिजिटल उपकरणांना हात लावू दिला नाही. (reduce screen time in kids) माझ्यावर जी वेळ आली आहे ती तुमच्या मुलांवर येऊ नये असे वाटतं असेल तर मुलाच्या स्क्रीन टाईमची काळजी घ्या.

तुमची मुले किती वर्षांची आहेत आणि ती मोबाईल, लॅपटॉप, गेमिंग पॅड , आयपॅड दिवसातील किती तास वापरतात हे पहा. (reduce screen time in kids) लहान वयात खरे तर मुलांना या सवयी असणे त्यांच्या शारीरिक आणि मानसिक दोन्ही आरोग्यांसाठी अपायकारकच आहेत. तुमचे मुल जर अगदी दोन वर्षांचे असेल तर त्याच्या हातात अजिबात फोन किंवा इतर यांत्रिक उपकरण देऊ नका. व्हिडिओ कॉलसाठी थोडावेळ त्यांच्यासमोर फोन धरला तर हरकत नाही. दोन ते चार वर्षांच्या मुलांच्या हातात फोन दिला तरी देखील मोजून पंधरा ते वीस मिनिटे ते देखील त्यांच्या करमणुकीसाठी एखाद दुसरी गाणी किंवा कार्टून असेल तर बघू द्या. त्यानंतर चार वर्षांपुढील मुलांना ऑनलाईन क्लासेससाठी अगदीच गरजेचे असेल तर एक तासभर किंवा त्यांचा क्लास जितका वेळ आहे तितकाच वेळ स्क्रीन वापरू द्या. त्याशिवाय मुलांना इतर व्हिडीओ, सिनेमे, व्लोग्स किंवा कोणत्याही गोष्टीसाठी स्क्रीन टाईम देऊ नका.

हातात फोन पकडताना किंवा लॅपटॉप, कंप्यूटरसमोर बसताना देखील मुलांना थोडे अंतर ठेवायला सांगा. आजचे युग डिजिटल युग आहे. सगळीकडे अगदी शाळा कॉलेज, शिक्षण सर्व क्षेत्रात डिजिटल उपकरणांची गरज भासते. यामुळे पालकांची खरी जबाबदारी आहे की त्यांनी आपल्या मुलांना योग्य स्क्रीनटाईम देऊन त्याचा मुलांच्या आरोग्यावर परिणाम होणार नाही याची काळजी घेणे. मग मुलांना या उपकरणांपासून जर दूर करायचे असेल तर पालक म्हणून काय करू शकता?

मुलांना बालनाट्य पाहायला घेऊन जा. त्यांना घराबाहेरच जग दाखवायला सुरु करा. दर विकेंडला तुम्ही मुलांसोबत गार्डनमध्ये जाऊ शकता. त्यांना वेगवेगळे खेळ दाखवू शकता जसे की मल्लखांब, गोळाफेक, मैदानी खेळ हे आपल्या जवळपास कुठे होतात याची माहिती घ्या आणि मुलांना ते दाखवा.

ऑडिओ बुकवरच्या गोष्टी त्यांना ऐकवा. त्यांच्यासोबत चित्र काढा. रंगीबेरंगी खडू, कलर्स आणून मुलांना चित्रकलेची आवड निर्माण करू शकता. कागदी होड्या बनवणे. कागदांपासून फुले तयार करणे असे छोटे छोटे क्राफ्ट्स त्यांना शिकवा. यामुळे मुलांच्या अंगी कला येईल. अशा अनेक गोष्टी करून तुम्ही मुलांचा सर्वांगिक विकास करू शकता आणि त्यांना डिजिटल उपकरणांपासून दूर ठेवून स्क्रीनटाईम देखील कमी करू शकता.

Sharing Is Caring:

Leave a Comment