monkeypox virus information in marathi

आपण कांजण्या म्हणजेच चिकनपॉक्स बद्दल ऐकलं असेलच. पण मंकीपॉक्स बद्दल ऐकलं आहे का? monkeypox virus information in marathi जगात कोरोनाच्या तडाख्यातून देश अजून सावरलेले नाहीत तोवर हा अजून एक आजार येऊन धडकला आहे. तर या लेखात या आजाराबद्दल व त्याच्या विषाणूबद्दल जाणून घेऊयात.

monkeypox virus information in marathi

मंकीपॉक्सची लागण जोरदार (monkeypox virus information in marathi):

या दुर्मिळ संसर्गाच्या येण्याने अमेरिका आणि युरोपातील शास्त्रज्ञ चिंतेत आहेत. सुदैवाने , आतापर्यंत भारतात संसर्गाचे एकही प्रकरण नोंदवले गेले नाही, monkeypox virus information in marathi. परंतु मंकीपॉक्सचा युरोपीय देश ब्रिटन, इटली, पोर्तुगाल, स्पेन, स्वीडन आणि अमेरिकेसह वीस देशांमध्ये जोरदार फैलाव होताना दिसत आहे. याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेनेही खबरदारीचा इशारा दिला आहे आणि ही सुद्धा महामारी होऊ शकते अशी चिंता व्यक्त केली आहे.

या आजारास मंकीपॉक्स हे नाव का पडले:

हा मानवी स्मॉलपॉक्स म्हणजेच गोवरासारखाच दुर्मिळ विषाणूजन्य सांसर्गिक आजार आहे. संशोधनासाठी ठेवलेल्या माकडांमध्ये तो प्रथम आढळून आला तो १९५८ मध्ये. त्यावरून त्याचे मंकीपॉक्स असे नाव ठेवले गेले. तर मंकीपॉक्सचा मानवांना संसर्ग झाल्याचे पहिले प्रकरण १९७० मध्ये नोंदवले गेले. हा रोग प्रामुख्याने मध्य आणि पश्चिम आफ्रिकेतील उष्णकटिबंधीय पर्जन्यवनाच्या प्रदेशात आढळतो आणि कधीकधी इतर प्रदेशांमध्येही पसरतो.

या आजाराबद्दल तज्ज्ञ काय म्हणतात monkeypox virus information in marathi:

हा ‘मंकीपॉक्स’ विषाणूच्या संसर्गामुळे होणारा एक दुर्मिळ रोग आहे. मंकीपॉक्सचा संसर्ग प्राण्यांपासून मानावाला व एका मानवापासून दुसऱ्याला होतो. मंकीपॉक्स विषाणू छोट्या जखमा,श्वसनमार्गातून किंवा डोळे,तोंडाद्वारे शरीरात प्रवेश करतो. प्राण्यांनी चावल्यामुळे अथवा बोचकारल्यामुळे, जंगली प्राण्यांचं मांस खाल्ल्याने या विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. कोरोनाप्रमाणेच याचे संक्रमण शिंकल्यानंतर तयार होणाऱ्या ड्रॉप्लेट्स मुळे होऊ शकते. रोगी व्यक्तीच्या शरीरातील घाम, थुंकी किंवा जखमांशी थेट व अप्रत्यक्षरित्या संपर्क आला की या आजाराचे मानवास संक्रमण होऊ शकते.

हा विषाणू ‘पॉक्सविरिडे’ या विषाणू कुटुंबातील आहे. या कुटुंबामध्ये कांजिण्या आणि गोवर या रोगांना कारणीभूत असलेले विषाणू देखील समाविष्ट आहेत.

मंकीपॉक्स या आजाराची काय आहेत लक्षणे:

मंकीपॉक्स विषाणू मानवी शरीतात गेल्यांनंतर या रोगाची लक्षणे स्पष्टपणे दिसण्याचा कालावधी साधारणतः एक ते दोन आठवड्यांचा असतो. परंतु काही प्रसंगी तो ५ – २० दिवसांपर्यंत असू शकतो आणि या कालावधीत व्यक्तीच्या संपर्कात आल्याने सहसा संसर्ग होत नाही. ताप येणे,पुरळ उठणे आणि जास्त संख्येने गाठी तयार होणे ही

मंकीपॉक्सची लक्षणे आहेत. काही वेळेस गुंतागुंतीची वैद्यकीय परिस्थिती होऊ शकते. हे पुरळ शक्यतो चेहऱ्यावर आणि हातपायांवर उठतात. चेहरा, हाताचे तळवे आणि पायांचे तळवे जास्त प्रमाणात व त्यानंतर तोंडात , जननेंद्रियाच्या ठिकाणी आणि डोळ्यातही पुरळ येतात. याची लक्षणे २-४ आठवड्यांपर्यंत असतात. रुग्णाची परिस्थिती गंभीर होऊ शकते. मृत्यू होण्याचं प्रमाण साधारणतः १-१०% इतकं आहे. लहान मुलांमध्ये या लक्षणांची तीव्रता अधिक आहे.

पुरळ उठणे सुरू होण्याच्या दोनेक दिवस आधी संक्रमित व्यक्ती हा रोग पसरवू शकतो आणि सगळ्या पुरळांवरील खपली पडेपर्यंत संक्रमण राहू शकते.

मंकीपॉक्सवर कसा उपचार केला जातो?

मंकीपॉक्स या रोगावर अजूनही कोणतेच ठराविक औषध नाही. म्हणूनच आधीपासून असलेल्या अँटीव्हायरल औषधांच्या द्वारे याचा उपचार करण्यात येतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्या लक्षणांची तीव्रता कमी करण्यावर भर देण्यात येतो. वर सांगितल्याप्रमाणे याचे विषाणू कांजण्याच्या विषाणूंच्या वर्गात मोडतात म्हणून कांजण्यांचे औषध देऊनच याचा उपचार केला जातो. ‘टेकोविरिमेट’ हेच उपचारासाठी वापरले जाणारे औषध आहे. ते खरंतर सर्वत्र मिळत नाही. म्हणून जिकडे जी अँटीव्हायरल औषधे आहे ती दिली जातात.

आपल्याकडे याचे रुग्ण नसतील ही चांगली बाब आहे पण आपण सतर्क राहायलाच हवं आहे. तुम्हालाही हेच वाटतं ना?

Sharing Is Caring:

Leave a Comment