Red Orange Yellow Alert Meaning : रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट; पावसासाठी दिल्या जाणाऱ्या अलर्टचा अर्थ नेमका काय आहे? जाणून घ्या..

Red Orange Yellow Alert : मित्रांनो, तुम्ही ट्रॅफिक सिग्नल बघितलेले असलेच.. जे की तीन रंगाचे असतात. ज्यामध्ये लाल, पिवळा आणि हिरवा रंग असतो. हे प्रत्येक रंग आपल्याला काही ना काही सांगत असतात. लाल रंग लागला की, समजायचे आपल्याला वाहन थांबवावे लागेल. पिवळा रंगाचा सिग्नल लागला तर स्पीड कमी करा आणि पुढे जाण्यासाठी तयार रहा. तर हिरवा रंग सांगतो की, वाहन सुरू करा. अशाप्रकारे तीन सिग्नलचे रंग तुम्हाला सांगत असतात.

ही झाली ट्रॅफिक सिग्नलची गोष्ट. पण तुम्हाला माहित आहे का वातावरणातील म्हणजेच पावसासाठी देखील काही सिग्नल दिलेले आहेत. त्यामध्ये हवामान विभागाने तीन प्रकारचे रंग दिलेले आहेत. ज्यामध्ये प्रत्येक रंग सांगतो की, वातावरण आणि पाऊस कसा राहील. तुम्हाला हे तीन रंग माहित होते का? माहित असेल पण तुम्हाला या तीन रंगाचे अर्थ माहित आहे का? हे जाणून घेणं प्रत्येकांसाठी महत्वाचे आहे. (Red Orange Yellow Alert Meaning in Marathi)

IMD Rain Alerts हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवण्यासाठी तीन रंग दिलेले आहेत. यामध्ये रेड, ऑरेंज आणि यलो असे तीन रंग देण्यात आले आहेत. हे नाव इंग्रजी भाषेतून देण्यात आले आहेत. तुम्ही टीव्हीवर हवामान अंदाज बघत असताना या भागात रेड अलर्ट दिला तर या भागाला ऑरेंज अलर्ट यर काही भागाला यलो अलर्ट दिला असं म्हणतात. या तीन रंग तुम्हाला काय सांगतात याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

1) रेड अलर्ट (Raid Alert Meaning)


जेव्हा एखाद्या भागात अतिमुसळधार किंवा अतिवृष्टीचा अंदाज दिलेला असतो अशावेळी हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात येतो. यामुळे नागरिकांना घराबाहेर पडू नये, अशी सूचना देण्यात येते. हा रेड अलर्ट दिल्यानंतर नागरिकांनी सुरक्षित राहावे आणि कुठे धोकादायक ठिकाणी जाऊ नये.

2) ऑरेंज अलर्ट (Orange Alert Meaning)


ऑरेंज अलर्ट सांगतो की, कोणत्याही वेळी आपत्ती येऊ शकते. नैसर्गिक संकटासाठी नागरिकांनी तयार रहावे यासाठी अलर्ट हवामान विभाग देत असते. गरज असेल किंवा काही काम असेल तेव्हाच बाहेर निघा, असं ऑरेंज अलर्ट मध्ये सांगण्यात येते.

3) यलो अलर्ट (Yellow Alert Meaning)


नेहमी वेगवेगळ्या भागासाठी यलो अलर्ट दिला जातो. ज्या भागात यलो अलर्ट दिला म्हणजे त्या नैसर्गिक संकट ओढवून येण्याची शक्यता असते. यामध्ये नैसर्गिक संकटं येऊ शकते, इमारती पडू शकतात, झाडे पडू शकतात, अनेक कामे रखडू शकतात. यासाठी सर्व नागरिकांना अलर्ट करण्यासाठी यलो अलर्ट देण्यात येतो.

Sharing Is Caring:

Leave a Comment