Poultry Farm Subsidy : केंद्र सरकार पोल्ट्री फार्म सुरू करण्यासाठी अनुदान देणार आहे. यासाठी खास योजना सरकार राबवत आहे. ग्रामीण भागात पोल्ट्री फार्म उघडण्यासाठी 50 टक्के सबसिडीसह 50 लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. या योजनेची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत.
केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन आणि दुग्धविकास खात्याअंतर्गत राष्ट्रीय पाळीव पशू कार्यक्रम मार्फत राबविण्यात येत आहे. मांस, दूध आणि अंडी यांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. यासाठी उत्पादन देखील वाढणं गरजेचं आहे. यामुळे केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे. (Poultry Farm Scheme in Maharashtra)
कशी आहे ही योजना?
ग्रामीण भागात पोल्ट्री फार्म सुरू करण्यासाठी 50 लाखांपर्यंत कर्ज दिले जाईल. यावर तुम्हाला 50 टक्के सबसिडी दिली जाईल. समजा, तुम्ही 50 लाख रुपये कर्ज घेतले तर तुम्हाला 25 लाख रुपये परत करावे लागतील. ही रक्कम तुम्हाला बॅंकेत तुम्हाला दोन हप्त्यांत जमा करावे लागतील.
कर्ज कोणाला मिळणार?
1) बचत गट
2) उद्योजक
3) शेतकरी
4) सहकारी संस्था
5) शेतकरी उत्पादक संस्था
6) कंपनी कायद्याच्या कलम 8 अंतर्गत स्थापन झालेल्या संस्था
7) या योजनेअंतर्गत कोणत्याही व्यक्तीला कर्ज मिळेल.
योजनेच्या अटी व शर्ती
कर्ज घेणाऱ्याच्या नावावर कमीत कमी एक एकर शेतजमीन असायला हवी. यासंबंधित कागदपत्र अर्जाला जोडणं आवश्यक आहे. जर तुमची स्वतःची जमीन नसेल तर लीजवर घेतलेल्या जमिनीवरही कर्ज घेता येतं पण अशा वेळेस हे कर्ज तुम्ही आणि जमीन मालक दोघांच्या नावाने दिलं जाते.
या योजनेअंतर्गत कुणालाही कर्ज मिळते. सर्व नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येतो. या योजनेअंतर्गत कोणतीही राष्ट्रीयकृत बँका कर्ज उपलब्ध करून देईल. या योजनेसाठी कागदपत्रे कोणती लागतात व कुठे अर्ज करावा लागतो, याबाबतची माहिती जाणून घेऊया. kukut palan yojana maharashtra
आवश्यक कागदपत्रे
1) आधार कार्ड
2) पॅन कार्ड
3) मतदान कार्ड
4) रहिवासी दाखला
5) जात प्रमाणपत्र (असल्यास)
6) सविस्तर प्रकल्प अहवाल
7) पोल्ट्री फार्म उभं करायचं आहे त्या ठिकाणचा फोटो
8) जमिनीची कागदपत्रं
9) ज्या बँकेतून कर्ज घ्यायचं आहे त्या बँकेत असलेल्या तुमच्या खात्याचे दोन कॅन्सल चेक
10) आवश्यक फॉर्म
11) कौशल्य प्रमाणपत्रं
12) स्कॅन सही.