Ration New Update:आत्ता झालेल्या दिवाळीला राज्य सरकारने रेशन कार्डधारकांसाठी खास निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे राज्यातील सर्व शिधापत्रिका धारकांना ‘आनंदाचा शिधा’ देण्यात आल्या होत्या. यामध्ये 100 रुपयांत 1 किलो साखर, 1 किलो रवा, 1 किलो चणाडाळ आणि 1 किलो पामतेल देण्यात आले होते. पुन्हा रेशन कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी आली आहे.
रेशन कार्डधारकांना पुन्हा ‘आनंदाचा शिधा’ दिल्या जाणार आहे. याबाबत राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सर्व रेशन कार्डधारकांना ‘आनंदाचा शिधा’चा लाभ दिल्या जाणार आहे. हा लाभ केव्हा दिल्या जाणार आहे, त्याबाबत माहिती जाणून घेऊयात. (Ration News Maharashtra)
पुन्हा मिळणार आनंदाचा शिधा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि गुढीपाडव्यानिमित्त राज्यातील रेशन कार्डधारकांना 100 रुपयांत ‘आनंदाचा शिधा’ मिळणार असल्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. याचा फायदा राज्यभरातील 1 कोटी 63 लाख शिधापत्रिका धारकांना होणार आहे. राज्यातील सर्व रेशन दुकांनामध्ये हा शिधा मिळणार आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निर्णयाला मंजुरी दिली आहे. दरम्यान यापुर्वीही दिवाळीला असा निर्णय घेण्यात आला होता. त्यावेळी 100 रुपयांत देण्यात आलेल्या आनंदाचा शिधामध्ये 1 किलो साखर, 1 किलो रवा, 1 किलो चणाडाळ आणि 1 लिटर पामतेल या चार वस्तूंचा समावेश होता.
anandacha shidha news गोरगरिबांचा सण गोड व्हावा, या उद्देशाने राज्य सरकारने या वस्तूंचे किट केवळ शंभर रुपयांमध्ये देण्याचा निर्णय पुन्हा घेतला आहे. ही आनंदाची बातमी सर्व रेशन कार्डधारकांसाठी महत्वाची आहे, आपणं थोडंसं सहकार्य करुन ही माहिती पुढे नक्की शेअर करा.