Land Map Online Maharashtra | सातबारा उताऱ्यावर येणार जमिनीचा नकाशा, वाचा सविस्तर

Land Map Online Maharashtra: शेतजमिनीची संपूर्ण कुंडली सातबारा उताऱ्यावर असते. सातबारा उतारा शेतकऱ्यांसाठी महत्वाचा दस्तऐवज आहे. शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी या कागदपत्राची आवश्यकता असते. सातबारा उताऱ्यावर जमिनीची, जमिनीच्या मालकाची माहिती दडलेली असते.

सातबारा उतारा काढण्यासाठी तुम्हाला तलाठ्याकडे जावे लागत होते. satbara utara onlineमात्र, आता तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही. बदलत्या काळानुसार ऑनलाईन पद्धतीने सातबारा उतारा काढता येत आहे. हा ऑनलाईन सातबारा डिजिटल स्वाक्षरी सहित उपलब्ध झाला आहे.

जमिनीचे नकाशे ऑनलाईन होणार
महाराष्ट्रातील 28 जिल्ह्यांतील जमिनींचे नकाशांचे डिजिटलायजेशन केले जाणार आहे. असा महसूल विभागाने निर्णय घेतलेला आहे.‌ सातबारा उतारा जसा ऑनलाईन पद्धतीने दिल्या जात आहे, तशाच प्रकारे जागेचा नकाशाही ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतला आहे.

land map online सध्या पुणे, नाशिक, अमरावती, लातूर, रायगड, नागपूर या 6 जिल्ह्यात पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे. राज्यातील उर्वरित 28 जिल्ह्यांत आता हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यामुळे राज्यातील सर्व शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे.

सातबारा उताऱ्यावर जमीन मोजणीचा नकाशा उपलब्ध झाल्यावर संबंधित शेतमालकाला आपली जमीन नेमकी कुठे आहे हे दिसून जाईल. ही माहिती राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांसाठी महत्वाची आहे. आपणं थोडंसं सहकार्य करुन ही माहिती पुढे नक्की शेअर करा.

Sharing Is Caring:

Leave a Comment