Agriculture News : शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता 5 गुंठे जमीन खरेदी विक्री करता येणार, वाचा सविस्तर

Agriculture News

Agriculture News : राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे.‌ यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. तुकडेबंदी कायद्यातून शेतत रस्ता आणि विहीर घेण्यासाठी तसेच केंद्र आणि राज्य ग्रामीण घरकुल योजनेतून 500 चौरस फुटांपेक्षा कमी क्षेत्रफळाच्या घरांना तुकडेबंदीतून सवलत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

land record याबातचा राज्य सरकारने 14 जुलै रोजी शासन निर्णय देखील निर्गमित केला आहे. बागायतीसाठी 20 गुंठे आणि जिरायतसाठी 80 गुंठे जमिनीच्या खरेदी विक्रीला बंदी घालण्यात आली आहे. जर यापेक्षा कमी जमीन खरेदी करायची असेल तर यासाठी जिल्हाधिकारी यांची परवानगी घ्यावी लागते.

शेतकऱ्यांना विहीरीसाठी, रस्त्यांसाठी आणि घरकुलासाठी लाभार्थ्यांना किमान जमीन खरेदी विक्री करता येत नाही. शेतकऱ्यांना हा त्रास सहन करावा लागत आहे. हीच अडचण राज्य सरकारने लक्षात घेऊन मोठा निर्णय घेतला आहे. आता विहिरीसाठी, रस्त्यासाठी आणि वैयक्तिक घरकुलासाठी 500 चौरस फूटापर्यंत तुकडेबंदीतून सूट देण्यात आली आहे.

आता राज्य शासनाच्या नवीन नियमानुसार,
land records जिल्हाधिकाऱ्यांना 5 गुंठे जमीन खरेदी विक्रीला परवानगी द्यावी लागणार आहे. यासाठी नवीन नियमावली तयार करण्यात आली आहे. चला तर मग ही नियमावली जाणून घेऊया.

विहिरीसाठी नियमावली
आता नवीन निर्णयानुसार जिल्हाधिकाऱ्यांना विहिरीसाठी कमाल 2 गुंठे जमीन खरेदी विक्री करण्यासाठी परवानगी द्यावी लागणार आहे. farmer news जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिल्यानंतर त्यांचा आदेश विक्री दस्तासोबत जोडावी लागेल. (Land Record Maharashtra)

घरकुलासाठी नियमावली
घरकुघरकुलासाठी अशी असेल नियमावली500 चौरस फुटांपर्यंतची जमीन हस्तांतरित करण्यासाठी आपण जिल्हा ग्रामीण विकास अभिकरणाकडून परवानगी मिळवावी लागेल. जरी खात्री आपल्याला मिळाली असेल, तर त्यानंतर आपल्याला जमीन हस्तांतरित करण्याची परवानगी मिळेल. कृपया याबाबत स्थानिक अधिकारीकडे संपर्क करून पूर्ण प्रक्रिया विचारून घ्या.

शेत रस्त्यासाठी नियमावली
शासनाच्या नवीन निर्णयानुसार, शेत रस्त्यासाठी जमीन हस्तांतरित करण्यासाठी जिल्हाधिकारीकडे अर्ज करावा लागतो. तसेच जिल्हाधिकारी महोदयांकडे अर्ज केल्यानंतर जमिनीवरील प्रस्तावित शेत रस्त्याचा अहवाल पडताळला जातो आणि परवानगी मिळवल्यानंतर, आपल्याला शेत रस्त्याचे भूसंपादन किंवा खरेदीसाठी प्रक्रिया पुर्ण करावी लागते.

land records maharashtra आपल्याला मंजुरी आणि परवानगी मिळाल्याचं सुनिश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारीकडे संपर्क साधवा आणि कागदपत्रांची पडताळणी संपूर्ण करून घ्यावी.

मंजुरी फक्त एक वर्षासाठीच राहणार
या नवीन शासन निर्णयानुसार शेतरस्त्यासाठी, विहिरीसाठी किंवा घरकुलासाठी जमिनीच्या हस्तांतरणासाठी मिळणारी जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी केवळ एक वर्ष दिली जाणार आहे. परंतु अर्जदाराने विनंती केल्यास दोन वर्षापर्यंत मुदत वाढ दिली जाऊ शकते. अशा प्रकारचा शासनाचा नवीन निर्णय आहे. हा निर्णय शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकतो.

Sharing Is Caring:

Leave a Comment