Mahavitaran Solar Rooftop | महावितरणाची खास योजना, आता मोफत वीज मिळणार; वाचा सविस्तर

Mahavitaran Solar Rooftop

Mahavitaran Solar Rooftop: आजकाल इलेक्ट्रिसिटीचा एवढा वापर होत आहे विचारु नका..! फॅन, कुलर, एसी, टिव्ही, बल्ब, वॉशिंग मशीन, मिक्सर, फ्रीज, चार्जिंग करणे असे अनेक कामं इलेक्ट्रिसिटीवर होतात. परंतु, महिन्याच्या अखेरीस हातात पडणारे वीजबिल पाहून काळजाचा ठोका चुकू शकतो.. काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे, व्यवस्थितपणे लाईट नसते.

वीजबिलापासून आणि लाईटच्या झंझटीपासून तुम्ही सुटका मिळवू शकणार आहात. इलेक्ट्रिसिटी फुकट मिळवायची म्हटले की, सौर उर्जेचा वापर करावा लागतो. सौर ऊर्जेच्या वापरला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार तसेच राज्य सरकार नेहमी प्रयत्न करत असते. mahavitaran solar rooftop agency

सरकार सोबत आता महावितरण देखील सौर ऊर्जेला प्रोत्साहन देत आहे. महावितरणने देखील छतावरील (Rooftop Scheme) सौर ऊर्जा योजना आणली आहे. solar rooftop subsidy in maharashtra या योजनेअंतर्गत वीजबिलापासून सुटका मिळणार. या योजनेची सविस्तर माहिती जाणून घेऊ या..

महावितरण सौरऊर्जा योजना
या योजनेअंतर्गत महावितरणच्या ग्राहकांना छतावरील सौरऊर्जा निर्मिती यंत्रणा बसवण्यासाठी केंद्र सरकारकडून 40 टक्क्यांपर्यंत अनुदान मिळत आहे. सौरऊर्जा निर्मिती यंत्रणेमुळे लाईट बिलापासून तर सुटका मिळेलच त्यासोबतच नेटमीटरिंगद्वारे महावितरणकडून वर्षअखेर शिल्लक वीज देखील विकत घेतली जाते. असा या योजनेचा डबल फायदा होईल.

solar rooftop scheme या योजनेचं ग्राहकांसाठी पोर्टल सुरु करण्यात आलेलं आहे. या पोर्टलचे नाव आहे नॅशनल पोर्टल फॉर सोलर रुफटॉप.. या पोर्टलवरुन ग्राहक या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करु शकतात. ही योजना जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहचावी यासाठी मंडळ, विभागीय, उपविभागीय कार्यालय तसेच एजन्सी प्रयत्न करत आहे.

अनुदान कसे मिळणार?
सौरऊर्जा योजनेद्वारे घरगुती ग्राहकांसाठी 1 ते 3 किलोवॅटसाठी 40 टक्के आणि 3 किलोवॅट ते 10 किलोवॅटसाठी 20 टक्के अनुदान देण्यात येत आहे. तसेच सामूहिक वापरासाठी 500 किलोवॅटपर्यंत अनुदान देण्यात येते. मात्र यामध्ये प्रत्येक घरासाठी 10 किलोवॅटची मर्यादा आहे. msedcl solar rooftop subsidy in marathi

अर्ज कुठे करायचा?
महावितरण रूफटॉप सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. mahavitaran solar rooftop scheme application हा अर्ज तुम्हाला महावितरणच्या अधिकृत वेबसाईटवर करावयाचा आहे. www.mahadiscom.in ही महावितरणाची अधिकृत वेबसाईट आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment