Ration Card : आता धान्याऐवजी रेशन कार्डधारकांना पैसे मिळणार, लगेच हा फॉर्म भरून द्या

Ration Card News Maharashtra: रेशनकार्ड (Ration Card) अतिशय महत्त्वाचा सरकारी दस्तावेज आहे. अनेक सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड असणं आवश्यक असते. रेशन कार्ड मध्ये तीन प्रकार आहेत. पिवळं, केसरी आणि पांढरं असे तीन प्रकारचे रेशनकार्ड आहेत. यामधील केशरी रेशनकार्ड याला एपील (APL) कार्ड असे म्हणतात.

या तीन प्रकारच्या रेशन कार्डधारकांना माफक दरात धान्य दिले जाते. ज्यामध्ये गहू, तांदूळ, तेल, साखर, तूर दाळ अशा विविध प्रकारच्या गोष्टी दिल्या जातात. या तीन रेशन कार्डाची विभागणीनुसार नागरिकांना लाभ दिला जातो. रेशन कार्डधारकांना सरकार मोफत राशन वाटप करत आहे. (Ration Card News in Marathi)

केशरी रेशन कार्डधारकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आलेला आहे. केशरी रेशन कार्डधारकांना अन्नधान्याऐवजी दरमहा लाभार्थ्यांना पैसे दिले जाणार आहे. अनेक दिवसांपासून केशरी रेशन कार्डधारकांचे राशन बंद होते. मात्र, या निर्णयामुळे केशरी रेशन कार्डधारकांना फायदा होणार आहे.

ration card धान्याऐवजी पैसे मिळणार

केशरी रेशन कार्डधारकांना धान्याऐवजी दर महिन्याला 150 रुपये दिले जाणार आहे. ही रक्कम डायरेक्ट रेशन कार्डधारकांच्या बॅंक खात्यावर जमा केली जाईल. या योजनेअंतर्गत देण्यात येणारी रोख रक्कम ही महिला कुटुंब प्रमुखाच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या बँक खात्यात जमा करण्यात येईल. ration card update maharashtra

याअगोदर केशरी रेशन कार्डधारकांना दर महिन्याला 5 किलो धान्य मिळायचे. ज्यात 2 रुपये किलो गहू आणि 3 रुपये किलो तांदूळ देण्यात येत होते. मात्र, आता या लाभार्थ्यांना धान्य दिले जाणार नाही. आता या लाभार्थ्यांना दर महिन्याला 150 रुपये ration card 150 rs रक्कम त्यांच्या बॅक खात्यावर जमा केली जाईल. ration card list

केशरी रेशन कार्डधारकांसाठी ही योजना आहे. इतर रेशन कार्डधारक या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. यामध्ये फक्त केशरी रेशन कार्डधारकांना 150 रुपये दिले जाणार आहे. गहू व तांदूळचा पुरवठा कमी असल्यामुळे धान्य बंद करून सरकारने पैसे देण्याचा निर्णय घेतलेला आहे. हे 150 रुपये मिळवण्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागतो. अर्ज प्रक्रिया कशी आहे याबाबतची माहिती जाणून घेऊ या..

Ration Subsidy 150Rs अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

येथे क्लिक करा.

Sharing Is Caring:

Leave a Comment