PM Kisan Yojana 12th Installment | पीएम किसान योजनेचा 12वा हप्ता या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार

pm kisan yojana 12th installment
pm kisan yojana 12th installment

PM Kisan Yojana 12th Installment: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये सुरू केलेली पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांसाठी महत्वाकांक्षी ठरली आहे. 31 मे ला 11 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे. देशातील एकूण 10.50 लाख कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर तब्बल 21 रुपये पाठविण्यात आले. आता शेतकऱ्यांना 12व्या हप्त्याची वाट पाहत आहे.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना दरवर्षी तीन टप्प्यांत 6000 रुपये मिळतात. आतापर्यंत 11 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत. 11 वा हप्ता 31 मे 2022 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला होता. परंतु, काही शेतकऱ्यांच्या बॅक खात्यावर 2 हजार रुपये जमा झालेले नाहीत. (PM Kisan Yojana 12th Installment Date)

11 वा हप्ता ज्यांना मिळाला नाही त्यांनी हे काम करा

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 11 वा हप्ता ज्या शेतकऱ्यांना मिळाला नाही, त्यांनी pmkisan.gov.in या वेबसाईटवर जावे. या वेबसाईटवर ‘फॉर्मर्स कॉर्नर’वर (Farmers Corner) क्लिक करा. तिथे तुम्हाला पैसे का नाही मिळाले याचे कारण जाणून घेता येईल. ही माहिती जाणून घेतल्यानंतर तुम्ही जी काही चूक दाखविली असेल ती दुरुस्त करून घेऊ शकता. तसेच हेल्पलाईन नंबरवर कॉल करूनही हेल्प घेऊ शकता.. (pm kisan yojana next installment)

12वा हप्ता कधी येणार..?


शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 12 वा हप्ता कधी मिळणार, याची प्रतीक्षा करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांना 12 वा हप्ता सप्टेंबर महिन्यात मिळणार असल्याचे समजते. परंतु, केंद्र सरकारच्या नियमांनुसार ‘ई-केवायएसी’ (eKYC) केलेल्या शेतकऱ्यांनाच हा हप्ता मिळणार आहे. तर जाणून घेऊया पीएम किसान योजनेची ‘ई-केवायएसी’ कशी करायची.

अशी करा ई-केवायसी

  • सर्वात अगोदर पीएम किसान योजनेच्या pmkisan.gov.in या वेबसाईटवर जा.
  • आता येथे तुम्हाला ‘Farmer Corner’ ऑप्शन दिसेल, तेथे ‘ई-केवायसी’ (E-KYC) या ऑप्शनवर क्लिक करा.
  • आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल, तिथे तुम्हाला आधार क्रमांक टाकून ‘सर्च’वर क्लिक करायचे आहे.
  • आता तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक ‘ओटीपी’ येईल.
  • यानंतर ‘सबमिट ओटीपी’ या ऑप्शनवर क्लिक करा. (pm kisan yojana ekyc)
  • आता आधार नोंदणीकृत मोबाईलवर आलेला ‘ओटीपी’ टाकला की तुमची ‘ई-केवायसी’ पूर्ण होऊन जाईल.

शेतकऱ्यांना ई-केवायसी केल्याशिवाय 12 वा हप्ता मिळणार नाही. तसेच मिळालेल्या माहितीनुसार पीएम किसान योजनेचा 12 वा हप्ता सप्टेंबर महिन्यात वर्ग करण्यात येईल. अजून पीएम किसान योजनेविषयी काही माहिती आल्यास नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवू. तुम्ही देखील ही माहिती पुढे शेतकऱ्यांना पाठवा.

हे देखील वाचा-

Sharing Is Caring:

1 thought on “PM Kisan Yojana 12th Installment | पीएम किसान योजनेचा 12वा हप्ता या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार”

Leave a Comment