Jio Offer Recharge | ‘जिओ’च्या ‘या’ रिचार्जवर होईल 200 रुपयांची बचत; घ्या ‘या’ ऑफरचा लाभ

Jio Offer Recharge: सध्या टेलिकॉम कंपन्यांमध्ये चांगलीच स्पर्धा वाढली आहे. यामुळे ग्राहकांना कमी पैशात जास्तीत जास्त सुविधा देणारे रिचार्ज प्लॅन लॉन्च केले जात आहे. ग्राहकांना सर्वात स्वस्त रिचार्ज देण्यासाठी ‘रिलायन्स जिओ’ पुढे आहे. यामुळेच कमी दिवसांत ‘जिओ’ची ग्राहक संख्या प्रचंड वेगाने वाढली आहे.

jio offer recharge
jio offer recharge

जिओ‘ स्वस्तात रिचार्ज सेवा देत असल्याने इतर टेलिकॉम कंपन्यावरही स्वस्तात रिचार्ज सेवा देण्याचे दडपण निर्माण केले आहे. यामुळे ग्राहकांना मात्र याचा फायदा होताना दिसतो. ‘जिओ’च्या रिचार्ज मध्ये काही ना काही सूट मिळत असते. (Jio Recharge Plan 2022)

तुम्ही देखील ‘जिओ’चे ग्राहक असाल तर तुम्हाला 200 रुपयांनी स्वस्त रिचार्ज प्लॅन मिळत आहे. जियो ग्राहकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. तुम्हाला या लेखात एका रिचार्ज प्लॅनविषयी माहिती देणार आहोत. ज्यामुळे तुमची 200 रुपयांची बचत होणार आहे.

‘जिओ’च्या या प्लॅनवर 200 रुपयांची बचत Jio Offer Recharge

आपण या प्लॅनची सविस्तर माहिती जाणून घेऊया. ‘जिओ’च्या 666 रुपयांची प्रीपेड प्लॅनची 84 दिवस वैधता आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला रोज 1.5 जीबी हायस्पीड डेटा मिळणार आहे. तसेच दररोज तुम्हाला 100 एसएमएस देखील मिळतात. याशिवाय 84 दिवस अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळेल.

तर तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की, 666 रुपयांच्या प्लॅनने रिचार्ज केल्याने 200 रुपयांची बचत कशी होणार आहे. तुम्ही 666 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनने रिचार्ज केल्याने तुमची नक्कीच बचत होणार आहे. तर 200 रुपयांची बचत कशी होईल ते जाणून घेऊया. (Jio Cheapest Recharge Plan 2022)

200 रुपयांची बचत अशी होणार

666 रुपयांचा प्लॅन तुम्हाला फक्त 466 रुपयांत पडणार आहे. तर यासाठी तुम्हाला ‘ॲमेझॉन पे’ (Amazon Pay) या मोबाईल ॲपवरून रिचार्ज करावा लागेल. जर तुम्हाला 200 रुपयांची बचत हवी असेल तर ‘ॲमेझॉन पे’ या मोबाईल ॲपवरूनच रिचार्ज करावे लागेल. इतर ॲपवरून केल्यास 200 रुपयांची बचत होणार नाही. (Jio Recharge Offers Amazon Pay)

या ‘युपीआय’ (UPI) पेमेंट ॲपमुळे तुमचे 200 रुपये वाचणार आहे. या ॲपवरून तुम्ही पहिल्यांदा रिचार्ज करत असाल, तर तुम्हाला या ऑफरचा लाभ मिळणार आहे. ही बातमी ‘जिओ’ ग्राहकांसाठी महत्वाची आहे. ही माहिती पुढे नक्की शेअर करा.

हे देखील वाचा-

Sharing Is Caring:

1 thought on “Jio Offer Recharge | ‘जिओ’च्या ‘या’ रिचार्जवर होईल 200 रुपयांची बचत; घ्या ‘या’ ऑफरचा लाभ”

Leave a Comment