Pashu Kisan Credit Card | पशु किसान क्रेडिट कार्ड, शेतकऱ्यांना मिळणार पशुपालनासाठी कर्ज; जाणून घ्या फायदे

Pashu Kisan Credit Card

Pashu Kisan Credit Card: शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत असते. सरकार पशुपालन व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार विविध योजना राबवते. मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी खास योजना सुरु केली आहे. या योजनेचं नाव पशु किसान क्रेडिट कार्ड असं आहे. ही योजना किसान क्रेडिट कार्ड सारखीच आहे.

kisan credit card in marathi केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी पशु किसान क्रेडिट कार्ड योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एक ठराविक रक्कम कर्ज म्हणून दिली जाते आणि ती बँकेच्या ठरलेल्या व्याजदरानुसार आणि मुदतीनुसार परत करावी लागते.

पशु किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत पशुपालक शेतकऱ्यांना कर्ज दिले जाते. kisan credit card अनेक शेतकऱ्यांना पशुपालन व्यवसाय सुरु करायचा असतो परंतु, पैसे नसल्यामुळे शेतकरी व्यवसाय सुरु करु शकत नाही. मात्र, आता या योजनेमुळे पशुपालन व्यवसाय सुरु करु शकतात.

पशु किसान क्रेडिट (KCC) योजनेत गाय पालन, म्हैस पालन, शेळी पालन, कुक्कुट पालन या व्यवसायासाठी कर्ज दिले जाते. पशु किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत प्रति जनावर कर्ज दिल्या जाणार आहे. pashu kisan credit card maharashtra या योजनेअंतर्गत लाभ कसा मिळणार जाणून घेऊ या..

पशु किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत मिळणार हे लाभ..
गाय – पशुपालक शेतकऱ्याला 40,783 रुपये प्रति गाय मिळेल.
म्हैस – पशुपालक शेतकऱ्यास 60,249 रुपये प्रति म्हैस मिळेल.
शेळी – पशुपालक शेतकऱ्याला शेळीचे पालन करायचे असेल, तर प्रति शेळी 4,000 रुपये मिळते.
किसान पशुपालक योजनेअंतर्गत पशुपालक शेतकरी केंद्र शासनाकडून 1,60,000 रुपयापर्यंतचा निधी मिळवू शकता.

pashu kisan credit card योजनेची पात्रता
देशातील सर्व पशुपालक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.
ज्या शेतकऱ्यांकडे शेत जमीन कमी आहे किंवा ज्या शेतकऱ्याकडे स्वत:च्या मालकीची जमीन नाही आणि जे शेतकरी गाय, बकरी, म्हशी इत्यादी पशूंचे पालन करतात, अश्या सर्व शेतकरी आणि पशुपालकांना लाभ घेता येणार आहे.

पशु किसान क्रेडिट कार्डसाठी कुठे अर्ज करायचा?
पशुपालकांना बँकेतून क्रेडिट कार्डची सुविधा देऊन लाभ देण्यात येतो. त्यासाठी पशुपालक शेतकऱ्याला बॅंकेमार्फत ऑफलाईन अर्ज करावा लागणार आहे. बॅंकेतून शेतकऱ्यांनी अर्ज घेऊन, अर्ज भरुन आवश्यक कागदपत्रे जोडून बॅंकेत अर्ज सादर करावयाचा आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment