दर महिन्याला ५ हजारांची गुंतवणूक करा अन् कोट्याधीश व्हा!

mutual fund भविष्यातील आर्थिक गरजा लक्षात घेऊन प्रत्येक व्यक्ती असे गुंतवणुकीचे पर्याय शोधतो, जिथे त्याला परतावा चांगला मिळेल. अशा परिस्थितीत म्युच्युअल फंडात गुंतवणूक तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. बदलत्या वेळेनुसार गुंतवणुकीच्या पद्धतीतही अनेक मोठे बदल झाले आहेत. शेअर बाजाराच्या चढ-उतारात अनेक लोक गुंतवणूक करणे टाळतात आणि पोस्ट ऑफिस स्कीम, एलआयसी, बँक एफडी तसेच इतर अनेक प्रकारच्या योजनांमध्ये गुंतवणूकीला पसंत करतात. यामध्ये म्युच्युअल फंड देखील आणखी एक चांगला पर्याय म्हणून समोर आला आहे. आजकाल लोक म्युच्युअल फंड योजनांमध्ये फक्त १०० रुपयांच्या छोट्या गुंतवणुकीने सुरुवात करून मोठा निधी उभा करू शकतात. यासाठी तुम्हाला सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच एसआयपीद्वारे गुंतवणूक करावी लागेल.

म्युच्युअल फंडात एकाच वेळी मोठी रक्कम जमा (गुंतवणूक) करण्याऐवजी एसआयपीद्वारे गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहेत. अशा स्थितीत जर तुम्ही SIP द्वारे गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर असा एक मार्ग आहे ज्याद्वारे तुम्ही एका वर्षात करोडपती होऊ शकता.

५ हजाराच्या गुंतवणुकीने व्हा श्रीमंत

म्युच्यअल फंडातून तुम्हाला दीर्घकाळात मजबूत परतावा हवा असेल, तर SIP तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरेल. म्युच्यूअल फंडात SIP द्वारे केल्यास तुम्हाला किमान १२ टक्के वार्षिक परतावा मिळतो. अशा स्थितीत जर तुम्ही SIP द्वारे म्युच्युअल फंडात दरमहा ५ हजार रुपयाची SIP सुरु केल्यास SIP कॅल्क्युलेटरनुसार १२% दराने तुम्ही २६ वर्षात १.१ कोटी रुपयांचा फंड उभा करू शकता. सोप्या शब्दात बोलायचे तर २६ वर्षात पाच हजार रुपयाच्या गुंतवणुकीने तुमची एकूण गुंतवणूक रक्कम १५.६ लाख रुपये होईल. तर तुम्हाला संपत्ती वाढ (वेल्थ गेन) म्हणून सुमारे ९५ लाख रुपये मिळतील. अशाप्रकारे २६ वर्षांत तुम्ही कोट्यवधींचे मालक बनाल.

१०,२० आणि ३० वर्षांत किती रिटर्न मिळणार?
तुम्ही १० वर्षासाठी दरमहा पाच हजारांची SIP केल्यास तुम्हाला १२ टक्के दराने सुमारे ११.६ लाख रुपयांचा परतावा मिळेल, ज्यात गुंतवणुकीची मर्यादा ६ लाख रुपये असेल आणि परतावा ५.६ लाख रुपये असेल. तर जर तुम्ही २० वर्षासाठी एकूण १२ लाखाची गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला परतावा ५० लाखाचा मिळेल. तसेच ३० वर्षांच्या कालावधीत तुमची गुंतवणूक १८ लाख असल्यास तुम्हाला १.८ कोटींचा परतावा मिळेल. लक्षात घ्या की ही सर्व रक्कम एसआयपी कॅल्क्युलेटरनुसार मोजली जाते.

Sharing Is Caring:

Leave a Comment