MHADA Lottery 2023: स्वत:चं हक्काचं घर असाव असं प्रत्येक व्यक्तीला वाटते. शहरात घर बांधायचे म्हटलं की, सोपं काम नाही. शहरातील घरांच्या किमती आवाक्याबाहेर सामान्य नागरिकांना परवडण्यासारखे राहिले नाही. परंतु, तुमचे घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी खास संस्था आहे. जिचं नाव महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडा असं आहे.
Cidco Lottery Uadate म्हाडा नेहमी घरांसाठी लॉटरी काढत आहे. आता पुन्हा सिडको आणि म्हाडाने नवीन योजना आणली आहे. यामध्ये तुमच्या घराचे स्वप्न 14 ते 17 लाखांत पूर्ण होणार आहे. जर तुम्हाला म्हाडात घर घ्यायचे असेल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. mhada kokan lottery 2023
mhada lottery कोकण मंडळातील 4752 म्हाडा घरांचे वाटप 11 एप्रिल 2023 रोजी केल्या जाणार आहे. यासाठी 20 फेब्रुवारीपासून अर्ज सुरू होतील. विविध ठिकाणी म्हाडा घरांसाठी लॉटरी निघालेली आहे, याबाबत माहिती जाणून घेऊ या..
येथे उपलब्ध असतील घरे..
सोडतीमध्ये योजनेच्या 20 टक्के म्हणजेच म्हाडाला खासगी बांधकाम व्यावसायिकांकडून मिळालेल्या 1554 घरांचा समावेश आहे. म्हाडाच्या या सोडतीमध्ये ठाणे, पाचपाखाडी, वसई, विरार, डायघर, सानपाडा, घणसोली येथील घरांचा समावेश आहे.
MHADA Lottery कुठे किती घरांचा समावेश?
शिरधाण – 340
खोणी – 60
गोठेघर – 256
विरार-बोळींज – 328
कोकण विभाग – 129
यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या अल्प उत्पन्न गटांचा समावेश आहे.
असा करा अर्ज
या योजनेत सहभागी होण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरावा लागतो. यासाठी तुम्ही म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करु शकता.