Land ownership law भाडेकरू बराच काळ भाडे देऊन नंतर घरमालकाला घर रिकामी करून देणार नाही असे सांगताना बऱ्याचदा आढळून येते. अनेकदा यावरून दोघांमध्ये वाद निर्माण होतो. अनेकदा भाडेकरू आणि घरमालक यांच्यात कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद होतात. जर एखादा भाडेकरू सतत १२ वर्षे घरात राहत असेल तर तो त्या मालमत्तेवर मालकी हक्क सांगू शकतो. या नियमाबद्दल लोकांना अनेकदा माहिती नसते त्यामुळे असे झाल्यास मालकाच्या हातून मालमत्ता निसटून जाऊ शकते. खूप वेळ भाड्या देऊन राहिल्यानंतर भाडेकरू आपल्या मालमत्तेवर कब्जा करू शकतो अशी भीती घर मालकांना वाटते आणि अशा अनेक बातमी समोर येतात कायद्याने काही परिस्थितीमध्ये भाडेकरूंना असा अधिकार दिला आहे की एखाद्या ठिकाणी दीर्घकाळ राहिला तर त्याचा ताबा बाहेर करून मिळवू शकतो तर कायद्यानुसार खरंच भाडेकरू मालमत्तेचा मालकी हक्क सिद्ध करू शकतो का आणि घर मालकाला याबाबतीत काय काय अधिकार आहे हे जाणून घेणं देखील गरजेचे आहे.
भारतीय मर्यादा कायदा 1963 नुसार, विशेष कायदा असल्याशिवाय, जर एखाद्या व्यक्तीला कोणत्याही जमिनीच्या मालकीचा दावा करायचा असेल, तर त्याने 12 वर्षांच्या आत त्या जमिनीच्या मालकीचा कायदेशीर दावा केला पाहिजे. जर त्या व्यक्तीने जमिनीच्या टायटलबाबत कोणताही कायदेशीर दावा करण्याची प्राथमिक प्रक्रिया न करता 12 वर्षांहून अधिक काळ घालवला असेल, तर त्याच्या दाव्याला वेळ मिळेल आणि त्याला त्या शीर्षकावर कोणताही कायदेशीर दावा करण्याचा अधिकार नसेल.
कायद्याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
हे देखील वाचा-
- विहिरीला व बोअरला पाणी कुठे लागणार, आता तुम्ही पाहू शकणार
- मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा
- घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
- अशा प्रकारे सुरू करा शेळीपालन. यश नक्कीच मिळेल.