Jamin Mojani Marathi | आता या नवीन मशिनद्वारे जमिनीची मोजणी होणार एका तासात, वाचा सविस्तर

Jamin Mojani Marathi
Jamin Mojani Marathi

Jamin Mojani Marathi: शेतकऱ्यांचे जमिनीवरून म्हणा किंवा बांधावरून म्हणा वादविवाद चालू असतात. कोणी म्हणते तुच माझा बांध कोरला तर समोरचा देखील व्यक्ती असंच म्हणतो. असंच हे प्रकरण वाढत जात असते. बोलण्या बोलण्यातून हे वादविवाद एवढे पेटतात की, मारामारी व्हायला सुरुवात होते.

जमिनीच्या वादविवाद अनेक ठिकाणी ऐकायला मिळतात. त्याला वाटते याने माझ्या जमिनीचा भाग घेतला तसेच याला देखील वाटते माझ्या जमिनीचा वाटा घेतला. कोणीही समजूतदारपणा घेत नाही. यामुळे हे वादविवाद मारामारीपर्यंत जातात. यासाठी जमीन मोजणी करणं गरजेचं आहे, वादविवाद करण्याची गरज नाही.

जमिनीचे वादविवाद मिटवण्यासाठी रोव्हर मशीन आलेली आहे. या मशीनने जमिनीचे मोजमाप करता येते. असे अनेक मोजमाप यंत्र आहे. परंतु, या यंत्राची खासियत आहे. हे यंत्र इतर यंत्रापेक्षा कमी वेळात जास्त मोजमाप करतो. रोव्हर मशीनमुळे एका तासात किंवा काही मिनिटांतच मोजणी करता येते. (Jamin Mojani Machine)

रोव्हर मशीन माहिती

रोव्हर मशिनद्वारे तुम्ही अर्ध्या जमिनीची मोजणी करू शकता. यामध्ये तुम्हाला अचूकता आणि पारदर्शकता पाहायला मिळेल. jamin mojani app महाराष्ट्र शासनाने भूमी अभिलेख विभागाला ही यंत्रे दिली आहेत. या मशिनद्वारे जमिनीची मोजणी कशी करायची याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. rover machine for land measurement

सध्या अचलपूर मध्ये प्तरायोगिक त्वावर या मशीनचा प्रयोग केला आहे. लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात या मशिनद्वारे जमिनीची मोजणी केली जाईल. पूर्वी जमिनीचे मोजमाप ईव्हीएस मशीनने केले जात होते‌. 200 मीटरवर एक टेबल होतं आणि ते टेबल दुसरीकडे कुठेतरी उचलावं लागत होतं. मधात झाडे असले की मोजणीला अडचण यायची आणि वेळ लागायचा. jamin mojani app

मशीनने जमिनीची मोजणी कशी होते पाहण्यासाठी

येथे क्लिक करा.

आता रोव्हर मशिनच्या जमिनीची मोजणी जलद गतीने करता येणार आहे. जीपीएस द्वारे ही मशीन जमिनीचे मोजमाप करेल. ही मशीन तुमच्यासाठी फार फायद्याची ठरणार आहे. शेतकऱ्यांना ही माहित असणं आवश्यक आहे. अशाच माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट देत जा. ही माहिती तुम्ही शेतकऱ्यांना नक्की शेअर करा.

हे देखील वाचा-

  1. विहिरीला व बोअरला पाणी कुठे लागणार, आता तुम्ही पाहू शकणार
  2. मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा
  3. घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
  4. अशा प्रकारे सुरू करा शेळीपालन. यश नक्कीच मिळेल.
Sharing Is Caring:

Leave a Comment