jamin mojani in 15 days सरकारचा नवीन निर्णय. आता शेत जमिन मोजनी होणार फक्त १५ दिवसांमध्ये तेही सॅटलाईटच्या माध्यमातून. भरावी लागेल फक्त एवढी शुल्क फी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार जनतेच्या हिताचे अनेक निर्णय घेत असून आता वाढत्या तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार वाढत्या तंत्रज्ञानाचा आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. १ जुलै, २०२३ पासून सुरू होणार सेटेलाईट जमीन मोजणी. shet mojani appशेत जमिनीच्या मोजण्या आता विनाविलंब १५ दिवसात होणार. ही सर्व प्रक्रिया सेटेलाईटच्या मध्मातून होणार. आधुनिक पद्धत वापरून शेत जमीन मोजणी होणार असे जिल्हा पालकमंत्री श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांना सांगितले.

शेतकऱ्यांना शेतजमीन मोजणीसाठी होणारा त्रास –
१) मोजणी झाल्यानंतर झालेल्या खाणाखुणा काढून टाकणे.
२) वारंवार जमीन मोजणी करणे.
३) यासह मोजणी निगडित वाद होणे.

मोजणी विभागाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासावर रामबाण उपाय शोधला आहे. jamin mojani app

सेटेलाईट पद्धतीने होणाऱ्या मोजनीचा शेतकऱ्यांना होणारे फायदे –
१) मोजणीच्या वेळेत निम्म्याहून अधिक वेळेची बचत.
२) शेतकऱ्यांना अक्षांश आणि रेखांशसह मोजणी नकाशे मिळणार.
३) शेतकऱ्याची मोजणी विभागाकडे होणारी पायपीट थांबणार.
४) शेतकरी बांध कोरकोरी व वादाला पूर्ण विराम मिळणार.
५) अर्ज दिल्यावर १५ दिवसात मोजणी केली जाणार.

मोजणीसाठीचा अर्ज आणि कागदपत्रे – online shet mojani application
१) शेतजमिनीच्या हद्दीबाबत शंका निर्माण झाल्यास शेतकरी भूमी अभिलेख विभागाच्या तालुका स्तरावरील उप-अधीक्षक भूमी अभिलेख किंवा नगर भूमापन अधिकारी यांच्या कार्यालयात अर्ज करू शकतात. jamin mojani app
या अर्जाचा नमुना सरकारच्या bhumiabhilekh.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
२) भूमी अभिलेख कार्यालया कडून केल्या जाणाऱ्या जमिनीच्या मोजणी मध्ये साधी मोजणी, तातडीची मोजणी आणि अतीतातडीची मोजणी असे प्रकार आहेत. प्रत्येक प्रकारच्या मोजणी फी सुद्धा वेगवेगळी आहे. shet mojani app
३) मोजणीसाठी जी फी (शुल्क) आकारली जाते, तिची रक्कम किती क्षेत्रावर मोजणी करायची आहे आणि ती किती कालावधीत करून घ्यायची आहे, यावरून ठरत असते.
४) शेतजमिनीची मोजणी आणण्यासाठी मोजणीचा अर्ज, मोजणी फीचं चलन किंवा पावती, 3 महिन्यांच्या आतील सातबारा ही कागदपत्रं प्रामुख्यानं लागतात.
५)सगळी माहिती भरून झाली की कागपत्रांसहित मोजणीचा अर्ज कार्यालयात जमा करायचा आहे.
६) एकदा का अर्ज जमा केला की, तो ई-मोजणी या प्रणालीत फीड (दाखल) केला जातो. त्यानंतर शेतकऱ्याच्या कागदपत्रांची तपासणी करून मोजणीसाठी किती फी लागणार आहे, याचं चलन जनरेट केलं जातं. त्या चलनाची रक्कम शेतकऱ्यानं बँकेत जाऊन भरायची असते. online shet mojani application
७) त्यानंतर मोजणीचा रेजिस्ट्रेशन नंबर (नोंदणी क्रमांक) तिथं तयार होतो. त्यानंतर मग शेतकऱ्याला मोजणी अर्जाची पोहोच दिली जाते. ज्यामध्ये मोजणीचा दिनांक, मोजणीस येणारा कर्मचारी, त्याचा मोबाईल क्रमांक, कार्यालय प्रमुख यांचा मोबाईल क्रमांक याची माहिती दिलेली असते. mojni app

Sharing Is Caring:

1 thought on “jamin mojani in 15 days सरकारचा नवीन निर्णय. आता शेत जमिन मोजनी होणार फक्त १५ दिवसांमध्ये तेही सॅटलाईटच्या माध्यमातून. भरावी लागेल फक्त एवढी शुल्क फी”

Leave a Comment