आता ग्रामपंचायतचे सर्व दाखले डाउनलोड करा मोबाईल वर फक्त २ मिनिटात | Gram Panchayat Dakhale Online

Gram Panchayat Dakhale Online
Gram Panchayat Dakhale Online

नमस्कार मंडळी, आपल्या महाराष्ट्र शासनातर्फे आता सर्व नागरिकांना ग्राम पंचायतचे सर्व दाखले ऑनलाईन घरबसल्या मिळणार आहे. महाइग्राम सिटीझन कनेक्ट अँप (mahaegram Citizen Connect app) असे या अँप चे नाव आहे, या अँप मदतीने ग्राम पंचायतीचे सर्व दाखले आपल्या मोबाइलमध्ये ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. या अँपच्या माध्यमातून गावकऱ्यांना आणि त्याच बरोबर ग्राम पंचयात कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

तुम्हाला ग्रामपंचायत कार्यालयातून मालमत्ते संबंधित दाखले, तसेच घरपट्टी, जन्म दाखला, विवाह नोंदणी दाखला,पानी पट्टी कर भरण्यासाठी ग्रामपंचायत मध्ये जाण्याची गरज भासणार नाही. या सर्व गोष्टींसाठी महाराष्ट्र शासनाने महा-ई-ग्राम ॲप तयार केले आहे. ग्रामविकास व पंचायतराज विभागाकडून ऑनलाईन पद्धतीने नागरिकांना घाबसल्या अनेक सुविधा व्हाव्यात या उद्देशाने हे अँप सुरू करण्यात आले आहे.

महा-ई-ग्राम ॲप च्या माध्यमातून तुम्हाला खलील सुविधा मिळणार आहेत.

 • विवाह नोंदणी प्रमाणपत्र
 • दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्र
 • जन्म प्रमाणपत्र
 • मृत्यू प्रमाणपत्र
 • असेसमेंट उतारा मिळवण्यासाठी अर्ज
 • पानी पट्टी
 • घर पट्टी
 1. महा-ई-ग्राम ॲप डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या मोबाईल मधील प्ले स्टोअर (play store) मध्ये जा.  येथे क्लिक करा.
 2. त्यानंतर हा ॲप डाउनलोड करून घ्या.
 3. त्यात संपूर्ण माहिती भरून लॉगिन करा.
 4. त्यामध्ये तुम्हाला या ॲपच्या विविध सुविधाचा लाभ घेता येणार आहे.

हे देखील वाचा-


Sharing Is Caring:

Leave a Comment