Google Pay UPI Lite : गुगल पे युजर्ससाठी खास सुविधा! आता पिन न टाकता करा UPI पेमेंट

Google Pay UPI Lite
Google Pay UPI Lite

Google Pay UPI Lite : गुगल पे हे एक ऑनलाईन पेमेंटचे ॲप आहे. अनेकजण हे ॲप वापरतात. ही ॲप एकदम सुरक्षित असून फास्ट पेमेंट करते. गुगल पे वापरकर्त्यांसाठी खास सुविधा सुरू केली आहे. यासाठी Google Pay ने UPI Lite प्लॅटफॉर्म सुरू केला आहे. ही सुविधा तुम्हाला पेमेंट करण्यासाठी वेळ लागू देणार नाही. छोटे छोटे पेमेंट करण्यासाठी तुम्हाला वारंवार युपीआय पिन टाकण्याची गरज पडणार नाही.

गुगल पे युजर युपीआय लाइट या प्लॅटफॉर्म मुळे पेमेंट सोपे आणि फास्ट करू शकणार आहेत. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने डिझाईन केलेली ही डिजिटल पेमेंट सेवा आहे. गुगल पे च्या म्हणण्यानुसार UPI Lite आता प्लॅटफॉर्मवर सुरू झालेला आहे. यामुळे पेमेंट सोपे, जलद आणि विश्वासार्ह बनवण्याचे उद्दिष्ट ठेवलं आहे. UPI Lite Google Pay वर आणल्या गेले आहे.

UPI Lite Google Pay द्वारे एका टॅपने 200 रुपयांपर्यंत पेमेंट करता येईल. यासाठी तुम्हाला युपीआय पिन टाकण्याची गरज नाही. आता तुम्हाला किराणा दुकानात सामान खरेदी करण्यासाठी, नाश्ता घेण्यासाठी किंवा इतर छोटं छोट्या वस्तू घेण्यासाठी पिन तुम्हाला टाकावा लागणार नाही. upi lite google pay

यूजर्स दिवसातून दोनदा 2000 रुपये लोड करू शकतात. आणि एका वेळी 200 रुपयांपर्यंत पेमेंट करू शकतात. सध्या भारतात 15 बँका UPI Lite या पेमेंट सुविधेला सपोर्ट करतात. यूजर्सना सोयीस्कर आणि सुपरफास्ट पेमेंट अनुभव देऊन व्यवहार सुलभ करणे UPI Lite फीचरचे उद्दिष्ट आहे.

Google Pay New Update गुगल पे ची UPI Lite ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. या सुविधेचा लाभ घेऊन पेमेंट करायला वेळ लागणार नाही. तसेच हे पेमेंट सुरक्षित आहे. UPI Lite या फिचरचा वापर कसा करायचा व UPI Lite ही सुविधा सुरू कशी करायची याबाबत प्रोसेस जाणून घेऊया. (Google Pay UPI Lite Feature)

Google Pay UPI Lite सुविधा अशी सुरू करा

  • सर्व प्रथम मोबाईलवर Google Pay ॲप ओपन करा.
  • यानंतर, प्रोफाइल आयकॉनवर क्लिक करा. यानंतर प्रोफाइल पेजवर खाली स्क्रोल करा. जिथे तुम्हाला UPI Lite एक्टिवेशन पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
  • आता तुम्हाला काही तपशील भरावे लागतील, यानंतर UPI Lite सुविधा सुरू होईल.
Sharing Is Caring:

Leave a Comment