Electric Tractor : ट्रॅक्टरमुळे शेतीची कामे देखील सोप्पी झाली आहे. जमिनीची मशागतीपासून ते पिकांचे काढणीपर्यंत ट्रॅक्टरचा वापर केला जातो. तसेच बाजारपेठेत शेतमाल विकण्यासाठी ट्रॅक्टरमध्ये घेऊन जावा लागतो. ट्रॅक्टरचा उपयोग आपण अनेक कामांसाठी करतो.
इंधनाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. यामुळे ट्रॅक्टरची अनेक कामाचे चार्जेस देखील वाढले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना देखील चांगलीच झळ बसत आहे. मात्र ही झळ कमी होण्यासाठी इलेक्ट्रिक ट्रॅक्टर भारतात लॉन्च झालेले आहे.
कार आणि स्कूटरनंतर आता इलेक्ट्रिक ट्रॅक्टरही बाजारात आले आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च कमी होणार आहे. ट्रॅक्टर निर्माता सोनालिका (Sonalika) कंपनीने इलेक्ट्रिक ट्रॅक्टर लॉन्च केला आहे. या ट्रॅक्टरचे नाव सोनालिका टायगर (Sonalika Tigar) असं आहे. हा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर स्वस्त आणि शक्तिशाली आहे.
सोनालिका टायगर इलेक्ट्रिक ट्रॅक्टरमुळे डिझेलचा कमी करण्यास आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यास मदत होईल. चला तर मग या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची सविस्तर माहिती जाणून घेऊया. Sonalika electric tractor tiger
सोनालिका टायगर इलेक्ट्रिक ट्रॅक्टर विषयी..
सोनालिका टायगर इलेक्ट्रिक ट्रॅक्टर 11 HP ट्रॅक्टर आहे ज्याची शक्ती जास्तीत जास्त 15 हॉर्सपॉवर पर्यंत जाऊ शकते. यामध्ये 6 गीअर्स आहेत त्यापैकी 6 फॉरवर्ड आणि 2 रिव्हर्स आहेत. ट्रॅक्टरची उचलण्याची क्षमता 500 किलो आहे म्हणजेच ती ट्रॉलीमधून 500 किलोपर्यंत वजन उचलू शकते. (sonalika tiger electric tractor)
Sonalika Tigar बॅटरी
सोनालिका टायगर इलेक्ट्रिक ट्रॅक्टरमध्ये 25.5 kw क्षमतेची शक्तिशाली बॅटरी आहे, जी साधारणपणे 10 तासात पूर्ण चार्ज होऊ शकते. या ट्रॅक्टरमध्ये फास्ट चार्जिंगचा पर्याय देखील आहे, ज्यामुळे 10 तासात देखील चार्ज होईल.
Sonalika Electric Tractor एकदा बॅटरी पूर्ण चार्ज केल्यावर ट्रॅक्टर 8 तास चालू शकतो. या बॅटरीमध्ये नैसर्गिक कूलिंग सिस्टीम आहे ज्यामुळे ती चार्ज होत असताना गरम होत नाही आणि बॅटरीचे आयुष्य 5000 तास आहे. हे या बॅटरीच खास वैशिष्ट्य आहे.
सोनालिका टायगर ट्रॅक्टरची किंमत
शेतकऱ्यांसाठी हा ट्रॅक्टर अतिशय गरजेचं आहे. कारण हा ट्रॅक्टर तुम्हाला कमी खर्चात शेतीची भरपूर कामे करून देईल. sonalika electric tractor price सोनालिका इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची किंमत 6.40 लाख ते 6.72 लाख दरम्यान आहे. सोबतच तुम्हाला 5 वर्षांची वॉरंटी देखील मिळेल.
हे देखील वाचा-
- विहिरीला व बोअरला पाणी कुठे लागणार, आता तुम्ही पाहू शकणार
- मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा
- घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
- अशा प्रकारे सुरू करा शेळीपालन. यश नक्कीच मिळेल.