अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. त्यानंतर आता आरोग्य आणि शिक्षण सुद्धा मानवाचे मुलभूत हक्क आणि गरजा आहे. यासाठी प्रयत्न झाले पाहिजे. शिक्षण ही महत्त्वाची गरज समजली जाते. शिक्षणाने माणूस घडतो आणि समाजाचा विकास होतो. परंतु आपल्या देशातील बऱ्याच नागरिकांची परिस्थिती बघता त्यांना मुलांना शिकविणे शक्य होत नाही. त्यांचा शिक्षणाचा खर्च त्यांना पेलवला जात नाही. त्यामुळे मुलांना तिथेच त्यांचे शिक्षण बंद करावे लागते. या परिस्थितीवर उपाय म्हणून शैक्षणिक कर्ज म्हणून एक महत्वाची योजना करण्यात आलेली आहे. ज्या अंतर्गत शिक्षणासाठी कर्ज देण्यात येणार आहे.
शिक्षणाच्या वाढत्या खर्चामुळे, विद्यार्थ्यांसाठी त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी शैक्षणिक कर्ज हा एक उत्तम पर्याय आहे. म्हणून, जर तुम्हाला देशातील सर्वोत्तम विद्यापीठांपैकी एकामध्ये शिक्षण घ्यायचे असेल आणि परतफेड रजा किंवा स्थगितीसह कर्ज हवे असेल तर हे मदत करू शकते.
साधारणपणे चार प्रकारचे शैक्षणिक कर्ज आहेत. एक म्हणजे करिअर एज्युकेशन लोन. या अंतर्गत एखाद्या विद्यार्थ्याला सरकारी कॉलेज, इन्स्टिट्यूट जसं की आयआयटी, इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी अशा ठिकाणी शिक्षण घेऊन करिअर करायचे असेल तर हे कर्ज घेता येते. त्यानंतर प्रोफेशनल ग्रॅज्युएट स्टुडंट लोन असते. जेव्हा कोणत्याही विद्यार्थ्याला ग्रॅज्युएशन पूर्ण करूनही त्यांचा अभ्यास चालू ठेवायचा असतो तेव्हा ते प्रोफेशनल ग्रॅज्युएट स्टुडंट लोन अंतर्गत येते. तिसरे म्हणजे पालक कर्ज. जेव्हा एखादा पालक आपल्या मुलाचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी बँकेकडून किंवा संस्थेकडून कर्ज घेतो तेव्हा त्याला पालक कर्ज म्हणतात. आणि शेवटचे म्हणजे अंडरग्रेजुएट लोन. जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याला शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर भारतात किंवा परदेशात पदवी मिळवायची असेल, तेव्हा तो ज्या कर्जासाठी अर्ज करेल ते अंडरग्रेजुएट लोन असेल.
शैक्षणिक कर्ज घेण्यासाठी पात्रता आणि प्रक्रिया काय असणार आहे? जाणून घ्या संपूर्ण माहिती.
हे देखील वाचा-
- विहिरीला व बोअरला पाणी कुठे लागणार, आता तुम्ही पाहू शकणार
- मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा
- घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
- अशा प्रकारे सुरू करा शेळीपालन. यश नक्कीच मिळेल.