E Nam Application: शेतकऱ्यांच्या शेतीमालाला चांगला भाव मिळावा यासाठी केंद्र सरकारने 2017 साली ई-नाम ही संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतला. ई-नाम म्हणजेच राष्ट्रीय कृषी बाजार. एक देश एक व्यापार या संकल्पनांवर ई-नाम सुविधा आहे. यामुळे देशातील कुठल्याही बाजारपेठेत शेतकरी आपला माल विकू शकतो.
शेतकरी आणि व्यापारी मध्ये पारदर्शकता आणण्यासाठी ही ई-नाम सुविधा आहे. शेतकऱ्यांना या सुविधेमुळे चांगला भाव घेता येणार आहे. ही सुविधा शेतकऱ्यांसाठी सुरू झालेली आहे. चला तर मग ई-नाम (E-Naam App) सुविधेविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ या..
E-Nam ई-नाम सुविधा
केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी e-NAM नावाचे एक ऑनलाइन पोर्टल आणि मोबाईल ॲप्लिकेशन देखील सुरू केले आहे. या मोबाईल ॲप्लिकेशनच्या साहाय्याने शेतकरी घरबसल्या शेतीमालाची (Agriculture Market) किमत, खरेदी आणि विक्रीच्या सुविधेचा लाभ घेता येतो.
ई-नाम ॲप्लिकेशन मध्ये विविध भाषांचा समावेश आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना अडचण येणार नाही. ई-नाम पोर्टल आणि ॲप्लिकेशनच्या माध्यमातून शेतकर्यांना पिकांची खरेदी आणि विक्री तसेच BHIM UPI द्वारे पेमेंट करण्याची सुविधा देखील आहे. ‘e nam yojana in marathi’
ई-नाम मोबाईल ॲप हे शेतकरी तसेच मंडी व्यापारी, ग्राहक, व्यापारी, कमिशन एजंट आणि शेतकरी उत्पादक संघटना यांचे संयुक्त व्यासपीठ आहे. त्यावर शेतमालाच्या विक्रीबरोबरच कृषी व्यवसायाशी संबंधित माहिती देखील देण्यात आली आहे. (E-Naam App Update)
ई-नाम ॲपच्या वापर असा करा
- सर्वात अगोदर गुगल प्ले स्टोअरवर जाऊन e-NAAM ॲप डाऊनलोड करा.
- आता ॲपमध्ये आपली नोंदणी करून घ्या.
- नोंदणी केल्यानंतर, 100 किलोमीटर अंतरातील बाजारपेठाची नावे येतात.
- त्यातील तुम्ही कोणतंही एक बाजारपेठ निवडा. तुम्हाला खरेदारीचे नाव दिसतील त्यापैकी तुम्ही कोणतंही एक नाव निवडा.
- नाव निवडल्यानंतर तुम्ही माल विक्री करू शकता.
अशाप्रकारे तुम्ही या ई-नाम पोर्टलच्या आणि ॲपच्या माध्यमातून विक्री करू शकता. तसेच शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना शेतीमाल विकताच एकरकमी पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणे बंधनकारक आहे. यामुळे व्यवहारात पारदर्शकता राहते.
ई-नाम या सुविधेमुळे अनेक शेतकरी आपला माल विक्री करत आहेत. तसेच अनेकजण खरेदी करत आहे. अनेक शेतकऱ्यांना याबाबत माहिती नाही. त्यासाठी आपणं ही माहिती पुढे नक्की शेअर करा. अशाच माहितीसाठी आमच्या पोर्टलला भेट देत जा.
E-Naam Application registration करण्यासाठी
हे देखील वाचा-
- विहिरीला व बोअरला पाणी कुठे लागणार, आता तुम्ही पाहू शकणार
- मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा
- घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
- अशा प्रकारे सुरू करा शेळीपालन. यश नक्कीच मिळेल.