Namo Shetkari Yojana | नमो शेतकरी सन्मान योजना; यादिवशी मिळणार 2 हजार रुपये, तारीख फिक्स

Namo Shetkari Yojana
Namo Shetkari Yojana

Namo Shetkari Samman Yojana : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेप्रमाणे, राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली. काही दिवसांपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत या योजनेला मंजुरी देण्यात आलेली आहे.

केंद्र सरकारची जशी प्रधानमंत्री किसान योजना आहे, तशाच प्रकारची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना (Namo Shetkari Yojana) आहे. या योजनेला मान्यता मिळाली असून या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना लवकरच दिला जाणार आहे. ही योजना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरेल.

Namo Shetkari Mahasanman Yojana

या योजनेमध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेप्रमाणेच नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता असणार आहे. म्हणजेच शेतकऱ्यांना दर चार महिन्याला 2,000 रुपयांचा हप्ता दिला जाणार आहे.

महाराष्ट्र राज्यातील राज्य सरकारची नमो शेतकरी सन्मान निधी योजना आणि केंद्र सरकारची प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना मिळून शेतकऱ्यांना एका वर्षाला 12,000 रुपये मिळणार आहे. राज्य सरकारच्या या योजनेमुळे दुप्पट रक्कम मिळणार आहे. (namo shetkari samman nidhi yojana in marathi)

नमो शेतकरी सन्मान निधी योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना घेता येणार आहे. केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेसाठी जे शेतकरी पात्र असतील त्यांनाच नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ मिळणार आहे. हे सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे.

Namo Shetkari Sanman Nidhi Yojana

पीएम किसान सन्मान निधी योजनेत जे शेतकरी पात्र नसतील ते नमो शेतकरी सन्मान निधी योजनेमध्ये देखील पात्र राहणार नाहीत. तुमचा पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता काही त्रुटींमुळे बंद झाला असेल, तर ही त्रुटी दुरुस्त करून घ्या.

ज्यांनी अजून त्यांच्या बँक खात्याला आधार नंबर किंवा मोबाईल नंबर लिंक केला नाही, अशांना पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ दिला जाणार नाही. यासाठी लवकरात लवकर हे काम करून घ्या. जी त्रुटी असेल ती देखील दुरुस्त करून घ्यावी. namo shetkari maha samman nidhi

हप्ता कधी मिळणार?

नमो शेतकरी योजनेचा हप्ता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना, पीएम किसान योजनेच्या हप्त्याबरोबर दिला जाणार आहे. पीएम किसान योजनेचा 14 वा हा लवकरच जाहीर करण्यात येणार असून, पीएम किसान च्या चौदाव्या हप्त्याबरोबरच नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना दिल्या जाणार आहे. namo shetkari yojana in marathi

जेव्हा pm kisan yojana चा 14 वा हप्ता जाहीर होईल तेव्हापासूनच नमो शेतकरी योजना देखील सुरू होणार आहे. शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. कारण शेतकऱ्यांना 4 हजार रुपये मिळणार आहे. त्यासाठी आपणं ही माहिती पुढे शेतकऱ्यांना नक्की शेअर करा.

हे देखील वाचा-

  1. विहिरीला व बोअरला पाणी कुठे लागणार, आता तुम्ही पाहू शकणार
  2. मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा
  3. घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
  4. अशा प्रकारे सुरू करा शेळीपालन. यश नक्कीच मिळेल.
Sharing Is Caring:

Leave a Comment