Crop Loan Cibil Score | पीक कर्ज घेताना सिबिल स्कोअर मागणाऱ्या बॅंकांवर गुन्हा दाखल करा; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले आदेश

Crop Loan Cibil Score
Crop Loan Cibil Score

Crop Loan CIBIL Score : शेतकऱ्यांना पेरणीसाठी पीककर्जाची आवश्यकता आहे. यासाठी शेतकऱ्यांना कर्ज काढावे लागत आहे. शेतकऱ्यांना पीक कर्ज (Crop Loan) घेताना सिबिल स्कोअरची अट रद्द केली आहे. हा निर्णय स्टेट लेव्हल बॅंकिंग कमिटी मध्ये झाला आहे. आता शेतकऱ्यांना सिबिल स्कोअर न विचारता कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे.

जर बॅंकांनी (bank loan) सिबिल स्कोअर (CIBIL Score) मागितल्यास सदर बॅंकांवर FIR दाखल करावा अशी सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. अमरावती जिल्ह्यातील खरीप हंगामातील बैठकीनंतर बोलताना फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.

याबाबत मिडियाशी बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले की, काही बॅंक शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी सिबिल स्कोअर मागत आहेत, मात्र आज स्पष्टपणे सूचना देत आहे की, अशा बॅंकांवर गुन्हा दाखल करण्यात यावा. शेतकऱ्यांना पीक कर्ज लवकर व सोप्या पद्धतीने मिळावे यासाठी सिबिल स्कोअरची अट लावू नये असे RBI म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बॅंकेचे आदेश आहेत.

तरी देखील शेतकऱ्यांना (farmers) जर सिबिल स्कोअरची अट लावली तर नाईलाजाने आम्हाला कारवाई करावी लागेल असा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय अनेक शेतकऱ्यांचे अनुदानाचे पैसे विविध बॅंकांनी कर्ज खात्यावर जमा केलेच्या तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. हे अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांचे पीक कर्ज खात्यावर टाकू नये, असं देखील फडणवीस म्हणाले.

तसेच जलयुक्त शिवार योजनेचं काम जलद गतीने करावे असा आदेश देखील देण्यात आला, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे नुकसान भरपाईचा पहिला टप्पा वितरित करण्यात आला आहे. उर्वरित राहिलेला दोन टप्प्यातील निधी लवकरच शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा केला जाईल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Agriculture Loan शेतकऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे. शेतकऱ्यांना पीक कर्ज घेताना सिबिल स्कोअर मागणार नाही. यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज घेण्यासाठी अडचण नाही. ही माहिती शेतकऱ्यांना माहित असायला हवी. यासाठी ही माहिती शेतकऱ्यांना नक्की पाठवा. अशाच माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट देत जा.

हे देखील वाचा-

  1. विहिरीला व बोअरला पाणी कुठे लागणार, आता तुम्ही पाहू शकणार
  2. मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा
  3. घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
  4. अशा प्रकारे सुरू करा शेळीपालन. यश नक्कीच मिळेल.
Sharing Is Caring:

Leave a Comment