Map of farm जर तुम्हाला शेताच्या बांधाच्या लांबी रुंदीचा नकाशा मिळाला तर त्याचा वापर विविध प्रकारच्या शेती बाबतीत असणाऱ्या नियोजनासाठी केला जातो. या नकाशाच्या आधारे बांधाच्या लांबीची मोजणी व रुंदीची मोजणी, तसेच जमिनीचा आकार अशा बऱ्याच गोष्टी माहिती पडतात. आता हा नकाशा तुम्हाला ऑनलाईन बघता येणार आहे.
शेतात जाण्यासाठी नवा रस्ता काढायचा असेल किंवा जमिनीच्या हद्दी जाणून घ्यायची असतील तर शेतकऱ्याकडे त्याच्या जमिनीचा नकाशा असणं आवश्यक असतं. आता सरकारनं सातबारा आणि आठ-अ उताऱ्यासोबत जमिनीचा नकाशा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे.
शेताच्या बांधाच्या लांबी रुंदीचे नकाशावर विविध प्रकारचे मार्ग दर्शविले जातात. ज्यामुळे जमिनीचा उपयोग आपल्याला कशा प्रकारे करता येईल हे सुध्दा ठरवता येते. शेताच्या बांधापासून पाणी म्हणजे तलाव किंवा नदी किती दूर आहे? ते आपल्याला कसे उपलब्ध होऊ शकते? याचे देखील प्रमाण आपल्याला नकाशावरून लक्षात येते.
शेत बांधाच्या लांबी रुंदीचा नकाशा हा शेतीच्या क्षेत्रातील पाण्याची व्यवस्था आणि नियंत्रण करण्यासाठी बांधाच्या लांबीच्या संरचनेची एक मोजणी आहे. बांधाच्या लांबी रुंदीला अनेक नावे दिली जातात, उदाहरणार्थ “कुणकुणी”, “बांधाची पाठी”, “आणि “पाटी” इत्यादी.
हा नकाशा ऑनलाईन पद्धतीने कसा बघायचा? याची माहिती आजच्या लेखात आहे. महसूल विभागाच्या माध्यमातून अनेक सुविधा नागरिक, शेतकरी यांच्यासाठी ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. त्यातलीच एक ही सुविधा आहे म्हणजे ई नकाशा किंवा भू नकाशा. यासाठी महाभूलेखच एक नवीन पोर्टल विकसित करण्यात आलेलं आहे. या पोर्टलवर जाऊन आपल्याला नकाशा बघता येणार आहे.
नकाशा डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
हे देखील वाचा-
- विहिरीला व बोअरला पाणी कुठे लागणार, आता तुम्ही पाहू शकणार
- मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा
- घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
- अशा प्रकारे सुरू करा शेळीपालन. यश नक्कीच मिळेल.