50 hajar anudan | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! या तारखेला नक्की मिळणार 50 हजार अनुदान

50 hajar anudan

50 hajar anudan : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर! राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी राज्य सरकारने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली होती. यामध्ये शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ करण्यात आले होते. तसेच, नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता.

ठाकरे सरकारने 2022 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अल्प मुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना हे अनुदान देण्याची घोषणा केली होती. (50 hajar anudan yojana) परंतु, त्यानंतर राज्यात सत्ता बदल झाली व शिंदे सरकार सत्तेवर आले. आता शिंदे सरकारने या योजनेचा निधी वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील शेतकरी या 50 हजार अनुदानाची वाट पाहत आहे. आता याबाबत शेतकऱ्यांसाठी आनंदाची आली आहे. बॅंकांनी दिलेल्या याद्यांची छाननी पूर्ण झाली असून, पुढील 15 दिवसांत 50 हजार प्रोत्साहन अनुदान शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा केली जाणार आहे. राज्यातील 28 लाख शेतकऱ्यांना या प्रोत्साहन अनुदानाचा लाभ मिळणार आहे. (50 हजार अनुदान)

50 hajar anudan yojana list प्रोत्साहनपर अनुदानाची वाट अनेक दिवसांपासून शेतकरी पाहत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयानुसार 2017-18 ते 2019-20 या तीन वर्षांत दोन वर्षे कर्जाची नियमित परफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. (50 hajar anudan gr)

अनुदान निधी..

  • 50 हजार अनुदान एकूण लाभार्थी – 28.14 लाख शेतकरी
  • 50 हजार अनुदान निधी मंजूर – 10,000 कोटी रुपये
  • प्रत्येक लाभार्थ्यांना मिळणार – 50,000 रुपये
  • 50 हजार अनुदान वाटपापूर्वीचे टप्पे – 3 (50 हजार अनुदान कधी मिळणार)

50 hajar anudan या तारखेला मिळणार अनुदान..


कृषी विभाग व बॅंकांकडून मिळालेल्या याद्यांची छाननी पूर्ण झाली असून, आता सहकार विभागाकडून 8 दिवसांत अंतिम याद्या जाहीर केल्या जातील. या याद्या ग्रामपंचायतीमध्ये लावल्या जाईल.‌ बँक खात्याशी आधार प्रमाणीकरण केल्यानंतर लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात 50 हजार अनुदान जमा केल्या जाईल. (50 hajar anudan list)

पात्र शेतकऱ्यांना 50 हजार अनुदान येत्या 20 ऑक्टोबरपूर्वी हे अनुदान शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा केले जाणार असल्याची माहिती सहकार विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. (50 हजार अनुदान यादी) ही माहिती शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आहे. तसेच ही माहिती पुढे इतरांना देखील नक्की शेअर करा.


हे देखील वाचा-



Sharing Is Caring:

1 thought on “50 hajar anudan | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! या तारखेला नक्की मिळणार 50 हजार अनुदान”

Leave a Comment