1 KW Solar Panel Price : विजेचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. ज्यामुळे लाईट बील देखील आवाक्याच्या बाहेर येत आहे. ज्यामुळे सामान्य नागरिकांना आर्थिक फटका बसत आहे. विजेचं प्रमाण देखील कमी करू शकत नाही. कारण वीज वापरणं काळाची गरज झालेली आहे. परंतु, यासाठी एक खास उपाय आपल्याला माहित आहे ज्याद्वारे मोफत वीज वापरू शकतो. सौर उर्जेवर तुम्ही घरात टीव्ही, फॅन, बल्ब अशा अनेक गोष्टी चालवू शकता.
अनेकजण घराच्या छतावर सोलर पॅनल बसवत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना लाईट बिलाचा खर्च कमी झाला आहे. बाजारात अनेक प्रकारचे सोलर पॅनल उपलब्ध आहेत. सौर ऊर्जा वापरण्यासाठी सरकार प्रोत्साहित करत आहे. सरकारकडून तुम्हाला सबसिडी दिली जात आहे. तुम्हाला जर 1 किलो वॅट सोलर घ्यायचा असेल, तर याची किंमत काय असेल हे आपण जाणून घेणार आहोत.
भारतातील नागरिकांना सोलर पॅनल बसवण्यासाठी केंद्र सरकारकडून अनुदान दिले जाते. त्यासाठी सोलर रूफ टॉप योजना सुरू करण्यात आली आहे. आता आपण जाणून घेऊयात की, 1 किलो वॅट सोलर पॅनलसाठी किती खर्च येईल आणि किती अनुदान तुम्हाला मिळेल. (1kw solar panel price in india with subsidy)
1 किलो वॅट सोलर पॅनल किंमत
काही तज्ञ लोकांनी दिलेल्या माहितीनुसार 1 किलो वॅट सोलर पॅनल बसवण्यासाठी जवळपास 85 हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. सोलर पॅनल एकदा बसवले की 25 वर्ष तुम्हाला काही पाहण्याची गरज नाही. जर आपण 1 किलो वॅट सोलर पॅनल बसवला तर 800 वॅट पर्यंत वीज वापरू शकता. ज्याद्वारे तुम्ही टीव्ही, फ्रीज, 5 ते 6 एलईडी बल्ब चालवू शकता.
1 KW Solar Panel सबसिडी
केंद्र सरकारकडून तुम्हाला 1 किलो वॅट सोलर पॅनलसाठी 30 ते 40 टक्क्यांपर्यंत सबसिडी दिली जात आहे. 1 kw solar plant price with subsidy ज्यामुळे ग्राहकांना काही टक्के रक्कम भरावी लागणार आहे. तुम्हाला 25 वर्षे सोलर पॅनलची वारंटी दिली जाती. जर तुम्ही इन्व्हर्टर बसवलं तर 3 ते 5 वर्षे वारंटी मिळते.
हे देखील वाचा-
- विहिरीला व बोअरला पाणी कुठे लागणार, आता तुम्ही पाहू शकणार
- मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा
- घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
- अशा प्रकारे सुरू करा शेळीपालन. यश नक्कीच मिळेल.