Google Maps Features : गाडी चालवताना गुगल मॅपचे ‘हे’ 5 फिचर्स जाणून घ्या, गुगल मॅप ऑफलाईन चालेल

Google Maps Features
Google Maps Features

Google Maps Features : आजकाल कितीही दूर जायचं असलं तर गुगल मॅपचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. कुणालाही रस्ता विचारायची गरज नाही. गुगल मॅप बरोबर तुम्हाला रस्ता सांगतो. गुगल मॅप आल्यामुळे ज्यांना रस्ता माहित नाही ते दूरदूर पर्यंत प्रवास करत आहे. पण अजून या गुगल मॅपचे वैशिष्ट्य आहे, जी तुम्हाला कदाचित माहित नसेल. ही वैशिष्ट्ये माहिती करून घेतल्यानंतर तुमचा फायदा होणार आहे.

रोजच्या प्रवासासाठी, लाँग ट्रिपसाठी, ड्रायव्हिंगवर फ्रेंड्स किंवा फॅमिलीसोबत कुठं अनोळखी ठिकाणी जायचं म्हटलं की, गुगल मॅप कामी येते. वाहतूक कोंडीच्या समस्येला देखील गुगल मॅप उपयुक्त आहे. अशा परिस्थितीत गुगल मॅप्सची नेव्हिगेशन सिस्टीम उपयुक्त ठरते. जर तुम्ही देखील गाडी चालवत असताना गुगल मॅपचा वापर करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. आम्ही तुम्हाला गुगल मॅपचे 5 खास वैशिष्ट्य सांगणार आहोत ज्यामुळे तुमचा ड्रायव्हिंगचा अनुभव अजून चांगला होईल. चला तर मग सविस्तर माहिती जाणून घेऊया..

1) ऑफलाईन मॅप डाऊनलोड करा

प्रवासातील सर्वात मोठी चिंता म्हणजे नेटवर्क नसणे, नेटवर्क नसले की गुगल मॅप बरोबर चालत नाही. यामुळे प्रवास सुरू करण्यापूर्वी ऑफलाइन मॅप डाऊनलोड करणं फायद्याचं आहे. तुम्ही प्रवास करण्यापूर्वी ऑफलाईन मॅप डाऊनलोड करून ठेवत जा.

2) नेमका वाहतूकीचा मोड निवडा

गुगल मॅप वाहन आणि रहदारीच्या परिस्थितीवर आधारित तुमच्यासाठी बेस्ट रस्ता ऑटोमेटिक काढून देतो. दरम्यान Google Maps वर सर्वोत्तम मार्ग निश्चित करण्यासाठी तुमचा प्रवास सुरू करण्यापूर्वी बाइक असेल तर बाईकचे चिन्ह निवडा. जर कार असेल तर कारचे चिन्ह निवडा. वाहन प्रकार योग्य निवडल्यानंतर सर्वात जलद मार्ग गुगल मॅप तुम्हाला दाखवून देईल.

3) लाईव्ह ट्रॅफिक अपडेट ऑन करा

गुगल मॅपच हे फीचर देखील जबरदस्त आणि फायद्याचं आहे. गुगल मॅपवर लाईव्ह ट्रॅफिक अपडेट Enable केलं तर रिअल टाइम अपडेट्स मिळवता येईल. ज्यामुळे तुम्ही ऐनवेळी वेगळा मार्ग निवडू शकता.

4) व्हॉइस नेव्हिगेशन चालू करा

अनेकजण गाडी चालवत असताना हेडफोन वापरत असतात. व्हॉइस नेव्हिगेशन चालू ठेवलं तर सतत मोबाईलमध्ये पाहण्याची गरज नाही. आवाजाने तुम्ही गाडी योग्य ठिकाणी घेऊन जावू शकता.

5) टोल किंमत Enable करा

अनेक ठिकाणी टोल असतात. टोलच्या किमतीची माहिती देखील गुगल मॅपद्वारे मिळवू शकता. जर तुम्ही लांबच्या प्रवासात नेमका टोल किती पडणार, हे तुम्हाला अगोदरच कळून जाईल. google map new feature

असे गुगल मॅपचे 5 फिचर्स आहे, ज्यामुळे तुमचा प्रवास अजून खास होईल. हे फीचर गुगल मॅपचा वापर करणाऱ्यांना माहित असणं आवश्यक आहे.

हे देखील वाचा-

  1. विहिरीला व बोअरला पाणी कुठे लागणार, आता तुम्ही पाहू शकणार
  2. मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा
  3. घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
  4. अशा प्रकारे सुरू करा शेळीपालन. यश नक्कीच मिळेल.
Sharing Is Caring:

Leave a Comment