१ लाखाच्या डाऊनपेमेंटवर Kia Carens घरी आणा, जाणून घ्या किती EMI द्यावा लागेल

 Kia Carens Loan DownPayment EMI Details: मोठ्या कुटुंबांसाठी भारतात ७ सीटर कार्सना मोठी मागणी आहे. या सेगमेंटमध्ये मारुती सुझुकीची अर्टिंगा ही कार पहिल्या क्रमांकावर असली तरी तिला किआ करेन्ससारख्या इतर ७ सीटर कार्सकडून तगडी स्पर्धा मिळत आहे. मोठ्या कुटुंबासाठी ही एक चांगली कार आहे. MPV सेगमेंटमध्ये या कारची चांगली विक्री होते. तुम्ही जर ही ७ सीटर कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, मात्र तुम्ही ती एकरकमी पैसे देऊन खरेदी करू शकत नसाल तर तुमच्याकडे ईएमआयचा पर्याय आहे. तुम्ही ही शानदार कार (Kia Carens Premium Petrol) अवघ्या १ लाख रुपयांच्या डाऊन पेमेंटवर खरेदी करू शकता. यावर तुम्हाला उत्तम ईएमआय पर्याय मिळेल.

Kia करेन्स ही कार भारतात प्रीमियम, प्रेस्टीज, प्रेस्टीज प्लस, लक्झरी आणि लक्झरी प्लस या 5 ट्रिम लेव्हलमध्ये एकूण १९ व्हेरिएंट्समध्ये विकली जाते. या कारची किंमत ९.६० लाख रुपयांपासून सुरु होते आणि या कारच्या टॉप व्हेरिएंटसाठी ग्राहकांना १७.७० लाख रुपये मोजावे लागतील. ही कार डिझेल आणि पेट्रोल अशा दोन इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. तसेच ही कार मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये उपलब्ध आहे. ही ७ सीटर कार २१ किमी प्रति लीटर इतक मायलेज देते.

Kia Carens Premium Petrol Loan Down Payment EMI

Kia Carnes या कारचं बेस मॉडेल म्हणजेच प्रीमियम पेट्रोल व्हेरिएंटची किंमत ९.६० लाख रुपये इतकी आहे. ही कार खरेदी करण्यासाठी ऑन रोड १०.७२ लाख रुपये मोजावे लागतील. ही कार तुम्हाला ईएमआयवर खरेदी करायची असेल तर तुम्ही १ लाख रुपये (प्रोसेसिंग फी, ऑन रोड आणि पहिल्या महिन्‍याचा ईएमआय) डाऊनपेमेंट करून घरी घेऊन जाऊ शकता. त्यानंतर तुम्हाला पुढील ५ वर्ष दर महिन्याला ईएमआय भरावा लागेल. ईएमआय कॅल्क्युलेटरनुसार. तुम्हाला ९.८ टक्के व्याजदराने ९,७२,३६३ रुपयांचं कर्ज मिळेल. त्यानंतर तुम्हाला पुढील ५ वर्षांसाठी दर महिन्याला २०,५६४ रुपयांचा हप्ता भरावा लागेल. म्हणजेच तुम्हाला एकूण २.६२ लाख रुपये व्याज द्यावं लागेल.

टिप – ही कार खरेदी करण्यापूर्वी, कर्ज, डाऊन पेमेंट आणि व्याजदर यांसारखे सर्व डीटेल्स जाणून घेण्यासाठी तुम्ही जवळच्या किआ मोटर्स डीलरशिपला भेट देऊ शकता.

किआ मोटर्सची कार Kia Carens बद्दल माहिती-

मॉडल लाइनअप अनेक व्हेरियंट एल, एलएक्स, ईएक्स, ईएक्स +, TX आणि TX+ मध्ये येतील. याशिवाय, याला काही निवडक व्हेरियंट वेगवेगळ्या ट्रिम्स मध्ये वर्गीकृत केले जाणार आहे. जसे L: HTP/HTM, LX: प्रीमियम, EX: प्रेस्टीज, EX+: प्रेस्टीज+, TX: लक्झरी आणि TX+” लक्झरी+। Kia Caren.
इंजिन
रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, Kia Carens चे इंजिन 140PS च्या जास्तीत जास्त पॉवर आणि 242Nm चे पीक टॉर्क जनरेत करेल. म्हणजेच आपली प्रतिस्पर्धी अर्टिगा हून जास्त पॉवरफुल असेल. मारुती अर्टिगा मध्ये १.५ लीटरचे पेट्रोल इंजिन माइल्ड हायब्रिड टेक्नोलॉजी सोबत येते. हे 105PS च्या जास्तीत जास्त पॉवर आणि 138Nm चे पीक टॉर्क जनरेट करते. या अपकमिंग Kia Carens ला 1.5L नेचुरली एस्पिरेटेड पेट्रोल आणि 1.5L डिझेल इंजिन सुद्धा दिले आहे.

यात जास्तीत जास्त डिझाइन एलिमेंट्स आणि फीचर्स Kia Seltos मधून घेतले जातील. हे आपल्या सेगमेंटची पहिली कार असेल ज्यात ६ सी टाइप यूएसबी सॉकेट आणि तिसरी रांगेतील सीट पर्यंत पोहोचण्यासाठी एक इलेक्ट्रिक बटन दिले जाईल. याशिवाय, ३६० डिग्री कॅमेरा, वायरलेस फोन चार्जिंग, मल्टीपल एअरबॅग, हिल स्टार्ट असिस्ट इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, एबीएस सोबत ईबीडी, फ्रंट आणि रियर पार्किग सेन्सर सारखे फीचर्स असू शकतील.

Kia Carens च्या बेस मॉडलची किंमत १५ लाख रुपये आणि फुल लोडेड व्हेरियंटची किंमत २० लाख रुपयांपर्यंत असू शकते. या प्राइस रेंज मध्ये लाँच केल्यास याची थेट टक्कर कॉम्पॅक्ट एमपीव्ही मारुती अर्टिगा, महिंद्रा मराजो आणि अपकमिंग ह्युंदाई कॉम्पॅक्ट MPV (Stargazer) शी होऊ शकतो. तर कारचे टॉप व्हेरियंट टोयोटा इनोव्हा क्रिस्टाच्या एन्ट्री लेवल व्हेरियंटला टक्कर देईल.

Sharing Is Caring:

Leave a Comment