महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन; केंद्र शासनाची मोठी योजना !

महिलांच्या हितासाठी आणि सक्षमीकरणाकरीता केंद्र सरकार अनेक योजना राबवत आहे. या योजनेमध्ये महिलांना रोजगार देण्यासाठी आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याकरीता सरकार शिलाई मशीन मोफत देत आहे. केंद्र सरकारतर्फे मोफत शिलाई मशीन मिळवून महिला घरबसल्या आपला व्यवसाय सुरू करू शकतात. मोफत शिलाई मशीन 2022 योजने अंतर्गत सर्व राज्यामध्ये 50 हजारांहून अधिक महिलांना मोफत शिलाई मशिन दिली जातात. या योजने अंतर्गत 20 ते 40 वर्षे वयोगटातील महिला अर्ज करून शिलाई मशीन मोफत मिळवू शकता.

काय आहे या योजनेचे उद्दिष्ट
मोफत शिलाई मशीन योजना 2022 चा मुख्य उद्देश हा आहे की देशातील ज्या महिला आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे त्यांना केंद्र सरकारकडून मोफत शिलाई मशीन देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे असा आहे. जेणेकरून या योजनेच्या माध्यमातून महिलांना रोजगाराची संधी निर्माण करून देता येईल आणि त्यांना घरबसल्या शिवणकाम करून चांगले उत्पन्न मिळू शकेल. महिलांना मोफत शिलाई मशीनचा लाभ सरकारकडून उत्तर प्रदेश, हरियाणा, गुजरात, महाराष्ट्र (Maharashtra), कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि बिहारमधील महिलांना दिला जात आहे.

अर्ज कसा करायचा
या योजनेंतर्गत इच्छुक कामगार महिला (Working women) ज्यांना अर्ज करायचा आहे, त्यांना प्रथम भारत सरकारच्या www.india.gov.in या वेबसाइटवर जावे लागेल. वेबसाइटला भेट दिल्यानंतर तुम्हाला तेथून अर्ज डाऊनलोड करावा लागेल. अर्ज डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल जसे की नाव, पत्ता, मोबाइल नंबर, आधार क्रमांक इ.

सर्व माहिती भरल्यानंतर, तुम्हाला तुमची सर्व कागदपत्रे तुमच्या अर्जासोबत फोटो कॉपी संलग्न करून तुमच्या संबंधित कार्यालयाला भेट द्यावी लागतील. त्यानंतर तुमच्या अर्जाची पडताळणी कार्यालयाच्या अधिकाऱ्याकडून केली जाईल. पडताळणी केल्यानंतर, तुम्हाला मोफत शिवणकामाचे मशीन दिले जाईल.

फ्री सिलाई मशीन योजनेचा अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा..

Sharing Is Caring:

6 thoughts on “महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन; केंद्र शासनाची मोठी योजना !”

Leave a Comment