UPI Payment: गेल्या अनेक दिवसांपासून डिजिटल पेमेंट करण्यावर अधिक भर आहे. पैसे सांभाळणे, ते व्यवस्थित भरणे यापेक्षा आपल्याला हा पर्याय सोयीस्कर वाटतो. पेमेंट करताना युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) हा अलिकडच्या वर्षांत सर्वाधिक वापरलेला पेमेंट मोड आहे.
युपीआय पेमेंट आपण गुगल पे, फोन पे, पेटीएम अशा अनेक ॲपद्वारे करतो. कधी कधी असं होतं की चुकून दुसऱ्या अकाउंटवर पैसे पाठविले जातात. आता असे झाले तरी देखील काळजी करण्याची गरज नाही. कारण हे पैसे तुम्ही परत मिळवू शकता.
आपल्याकडे कधी चुकीचे यूपीआय पेमेंट झाले आहे का किंवा आपण यूपीआयसह पैशाची देवाणघेवाण केली असेल तर आपल्याला खाली दिलेली संपूर्ण माहिती माहित असणे आवश्यक आहे. कारण प्रत्येकांसाठी हे महत्त्वाचे आहे. upi payment refund
UPI मधून चुकीच्या अकाउंटवर पैसे पाठवल्यानंतर काय करावे?
कधी कधी असं होतं की, तुमच्याकडून चूकीने दुसऱ्याच्या अकाउंटवर पैसे पाठविले जातात. जर तुमचे पैसे चुकीच्या खात्यात ट्रान्सफर झाले असतील, तर लगेच त्या खाते क्रमांकाचा स्क्रीनशॉट घ्या. हा स्क्रीनशॉट तुमचा पुरावा असेल.
यानंतर, तुम्ही गुगल पे, फोनपे किंवा पेटीएम सारख्या यूपीआय ॲपच्या कस्टमर केअरशी बोला,कस्टमर केअर तुम्हाला नक्कीच मदत करेल. तरी देखील तुमचे पैसे परत मिळत नसतील तर ट्रान्सफर केलेल्या बँकेच्या कस्टमर केअरशी बोला. upi wrong payment complaint
तसेच तुम्ही बँकेच्या कस्टमर केअरशी बोला. आपण थेट आपल्या बँकेत जाऊन शाखा व्यवस्थापक एसयूएक्सशी बोलू शकता तसेच बँकेतील व्यवहाराच्या पैशाचा स्क्रीनशॉट दाखवू शकता. तुमचे पैसे बँकेने परत केले नाही, तर तुम्ही RBI च्या लोकपालाकडे तक्रार करू शकता, आरबीआयमधील सर्वात वरिष्ठ अधिकारी लोकपाल आहेत, जे वादाचे प्रश्न सोडवतात.
जर तुमच्याकडून देखील चुकीचे अकाउंटवर पेमेंट केल्या गेले असेल तर वरील दिलेल्या पद्धतीचा वापर करुन पैसे परत मिळवू शकता.