Talathi Bharti 2023: तलाठी भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. तलाठ्याच्या रिक्त पद भरण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून परवानगी मिळाली असून, हे रिक्त पदे लवकर भरली जाणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तलाठी भरतीची वाट पाहत आहे.
आता भूमी अभिलेख विभागाकडून त्यांनी नियुक्त केलेल्या टिसीएस (TCS) कंपनीच्या माध्यमातून लवकरच याची परीक्षा घेतली जाणार आहे. आता राज्यातील 36 जिल्ह्यातील 4644 रिक्त तलाठ्यांची पदे भरली जाणार आहेत. talathi exam date 2023
विशेष म्हणजे talathi bharti परीक्षा पारदर्शकतेने होणार आहे. कारण ही परीक्षा टिसीएस या कंपनीच्या माध्यमातून घेतली जाणार आहे. यासाठी कंपनीने दोन तारखा जाहीर केल्या आहेत. या दोन तारखांपैकी कोणत्या एका तारखेला परीक्षा घेतली जाईल. तलाठी भरती 2023
राज्य सरकारकडून तलाठी भरती लवकर घेण्यासाठी प्रयत्न चालू आहे. दरम्यान तलाठी नोकरभरती मध्ये येणाऱ्या सर्व अडचणी आता दूर झाल्या असून लवकरच याची तलाठी भरती आयोजित केली जाणार आहे. राज्यातील तरुणांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे. आपण लेखात पुढे जाणून घेणार आहोत की, तलाठी भरती कधी होणार आहे.
तलाठ्यांची पदे रिक्त असल्यामुळे गाव खेड्यातील कारभार हा खूपच मंद झाला होता. शेतकऱ्यांची कामे देखील संथ गतीने होत आहे. यामुळे तलाठ्यांच्या कामाचा बोजा वाढत आहे. यामुळे तलाठ्यांची रिक्त पदे लवकरात लवकर भरणं आवश्यक आहे. शासनाकडून यासाठी प्रयत्न करणं चालू आहे. अर्जाची पद्धत ही ऑनलाईन असणार आहे.
talathi exam या तारखेला होणार परीक्षा
भुमि अभिलेख विभागाने तलाठी नोकर भरतीची परीक्षा घेण्यासाठी टीसीएस या कंपनीची नियुक्ती केली असून या कंपनीने 12 ऑगस्ट 2023 किंवा 17 सप्टेंबर 2023 या दोन तारखांचे पर्याय दिले आहेत. या दोन तारीखपैकी एक तारीख फिक्स करून परीक्षा घेतली जाईल.
Talathi Recruitment सध्या ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, तलाठी भरती ऑनलाईन अर्जासाठी खुला प्रवर्गातील उमेदवारांना 1,000 रुपये आणि मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना 900 रुपये परीक्षा फी राहू शकते.
या भरतीसाठी जवळपास पाच लाख उमेदवार अर्ज करणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. तलाठी भरतीसाठी एका उमेदवाराला एकाच जिल्ह्यासाठी अर्ज करता येईल. अर्ज भरताना उमेदवाराला या गोष्टीची काळजी घेणं आवश्यक आहे.
हे देखील वाचा-
- विहिरीला व बोअरला पाणी कुठे लागणार, आता तुम्ही पाहू शकणार
- मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा
- घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
- अशा प्रकारे सुरू करा शेळीपालन. यश नक्कीच मिळेल.