Solar Energy Project शेती करण्यासाठी वीज आणि पाणी अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत. शेतकरी बऱ्याचदा अनेक समस्यांना सामोरे जातात. त्यात वीज आणि प्राणी हा प्रमुख प्रश्न असतो. कारण वीज नसली तर विजेच्या अभावामुळे शेतकऱ्यांना पिकाला पाणी देण्यास अडचण निर्माण होते. या परिस्थितीला समजून घेत सरकारने सौर ऊर्जा प्रकल्प उभारले. शेतकऱ्यांचे सक्षमीकरण व्हावं, त्यांच्या पिकाची व्यवस्थित वाढ व्हावी त्यासाठी सरकारने सौर ऊर्जा प्रकल्प राबवला आहे. परंतु त्यासोबतच शेतकऱ्यांची आर्थिक भरभराट देखील व्हावी यासाठी सरकारने सौर ऊर्जा प्रकल्प Solar Energy Project अंतर्गत एक आर्थिक स्त्रोत निर्माण केला आहे. तो म्हणजे सौर ऊर्जा प्रकल्प अंतर्गत जमिनी भाड्याने देऊन त्या बदल्यात आर्थिक मोबदला प्राप्त करू शकतो. ज्यातून शेतकऱ्यांना आर्थिक रित्या सक्षमीकरण होण्यास मदत होते.
वीजपुरवठा देणाऱ्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा हा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही योजना सुरू आहे. 33 केव्ही उपकेंद्रापासून दहा किलोमीटर पर्यंत सरकारी जमीन तसेच पाच किलोमीटरपर्यंतचा खाजगी जमिनीची महावितरणाला गरज आहे. या योजनेअंतर्गत जर तुम्ही शासनाला जमीन भाड्याने देत असाल तर तुम्हाला त्या बदल्यात मोबदला मिळतो आणि तुमच्या आर्थिक विकासाकरता ते फायद्याचे ठरू शकते. या योजनेसाठी प्रक्रिया अंतर्गत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येतील. खाजगी जमिनीसाठी शेतकऱ्यांना अगोदर तीस हजार रुपये प्रत्येक एकरच्या मागे वार्षिक दिले जात होते. परंतु यामध्ये आता वाढ करण्यात आलेली आहे. आता मात्र पन्नास हजार रुपये वार्षिक भाडे प्रति एकरला शेतकऱ्यांना दिले जाणार आहे. Solar Energy Project या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना किंवा जमिनीच्या मालकाला वैयक्तिकरित्या गोष्टी उपलब्ध आर्थिक स्त्रोत उपलब्ध तर होणारच आहे. परंतु शासकीय जमिनी सुद्धा भाड्याने देऊ शकणार यांना सुद्धा अनुदान देण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या ग्रामपंचायत त्यांच्या शासकीय जागा या प्रकल्पासाठी भाड्याने देऊ इच्छितात त्यांना 15 लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. म्हणून शेतकरी आणि ग्रामपंचायत दोघींनी जागा भांडण देण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.Solar Energy Project
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
हे देखील वाचा-
- विहिरीला व बोअरला पाणी कुठे लागणार, आता तुम्ही पाहू शकणार
- मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा
- घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
- अशा प्रकारे सुरू करा शेळीपालन. यश नक्कीच मिळेल.