Sahakar Ayukta Recruitment 2023 : सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत विविध पदांसाठी नोकर भरती निघालेली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. दहावी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. या भरतीची संपूर्ण माहिती आपण या लेखात जाणून घेणार आहोत.
या लेखात पदाचे नाव आणि जागा, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, नोकरीचे ठिकाण व अर्जाची संपूर्ण माहिती या लेखात जाणून घेऊया.
Sahakar Ayukta Bharti 2023
पदाचे नाव : सहकारी अधिकारी श्रेणी 1, सहकारी अधिकारी श्रेणी 2, लेखापरीक्षक श्रेणी 2, सहाय्यक सरकारी अधिकारी/ वरिष्ठ लिपिक, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक, लघुटंकलेखक
एकूण जागा : 309 जागा
पदनिहाय जागा :
1) सहकारी अधिकारी श्रेणी 1 – 42 जागा
2) सहकारी अधिकारी श्रेणी 2 – 63 जागा
3) लेखापरीक्षक श्रेणी 2 – 07 जागा
4) सहाय्यक सरकारी अधिकारी/ वरिष्ठ लिपिक – 159 जागा
5) उच्च श्रेणी लघुलेखक – 03 जागा
6) निम्न श्रेणी लघुलेखक – 27 जागा
7) लघु टंकलेखक – 08 जागा
शैक्षणिक पात्रता :
1) सहकारी अधिकारी श्रेणी 1 : मान्यता प्राप्त विद्यापीठांतून कला (अर्थशास्त्रासह)/ वाणिज्य/ विज्ञान/ विधी/ कृषी शाखेतील पदवी किमान वित्तीय श्रेणीत उत्तीर्ण
2) सहकारी अधिकारी श्रेणी 2 : मान्यता प्राप्त विद्यापीठांतून कला (अर्थशास्त्रासह)/ वाणिज्य/ विज्ञान/ विधी/ कृषी शाखेतील पदवी उत्तीर्ण
3) लेखापरीक्षक श्रेणी 2 : मान्यता प्राप्त विद्यापीठांतून वाणिज्य शाखेतील ॲडव्हांस अकाउंट्सी व ऑडिटिंग या विषयासोबत बी.कॉम पदवी उत्तीर्ण किंवा मुंबई विद्यापीठातून फायनान्शिअल अकाउंटसी व ऑडिटिंग या विषयासोबत वाणिज्य शाखेची बी.कॉम. पदवी किमान द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण
4) सहाय्यक सरकारी अधिकारी/ वरिष्ठ लिपिक – 159 जागा : मान्यता प्राप्त विद्यापीठांतून कला/ वाणिज्य/ विज्ञान/ विधी/ कृषी शाखेतील पदवी उत्तीर्ण
5) उच्च श्रेणी लघुलेखक : (1) माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण (2) 120 श.प्र.मि. यापेक्षा कमी गतीचे नाही एवढ्या गतीचे लघुलेखनाचे आणि 40 श.प्र.मि यापेक्षा कमी नाही. एवढ्या गतीचे इंग्रजी टंकलेखनाचे किंवा 30 श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही. एवढ्या गतीचे मराठी टंकलेखनाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र
6) निम्न श्रेणी लघुलेखक : (1) माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण (2) 100 श.प्र.मि. यापेक्षा कमी गतीचे नाही एवढ्या गतीचे लघुलेखनाचे आणि 40 श.प्र.मि यापेक्षा कमी नाही. एवढ्या गतीचे इंग्रजी टंकलेखनाचे किंवा 30 श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही. एवढ्या गतीचे मराठी टंकलेखनाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र
7) लघुटंकलेखक : (1) माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण (2) 80 श.प्र.मि. यापेक्षा कमी गतीचे नाही एवढ्या गतीचे लघुलेखनाचे आणि 40 श.प्र.मि यापेक्षा कमी नाही. एवढ्या गतीचे इंग्रजी टंकलेखनाचे किंवा 30 श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही. एवढ्या गतीचे मराठी टंकलेखनाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र
वयाची अट : खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षे आणि मागास उमेदवारांसाठी 43 वर्षे
अर्जासाठी फी :
खुला प्रवर्ग – 765 रु.
मागासवर्गीय/ आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग/माजी सैनिक – 689 रुपये
नोकरी ठिकाण : पुणे
अर्जाची पद्धत : ऑनलाईन
अर्जाची शेवटची तारीख 19 जुलै 2023 आहे.